‘लॉकडाऊन’मधील बेरोजगारीमुळं अ‍ॅक्टरनं मागितली होती आर्थिक मदत, लोकांचा उदारपणा पाहून राजेश करीरच्या डोळ्यात आलं पाणी ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टीव्ही सीरियल बेगुसराय मध्ये शिवांगी जोशीच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेता राजेश करीर यांनी काम बंद असल्यानं त्यांना खूप अडचणी येत आहेत असं सांगितलं होतं. नुकतीच त्यांनी लोकांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं होतं. आता लोकांनी त्यांना मदत केली आहे. त्यांनी आता पुन्हा एकदा सोशलवरून व्हिडीओ शेअर लोकांचे आभार मानले आहेत. इतकंच नाही तर आता लोकांनी त्यांना पैसे पाठवणं बंद करावं असं त्यांनी म्हटलं आहे. आता पर्यंत जमा झालेले पैसे त्यांच्यासाठी खूप आहेत असं त्यांनी सांगितलं आहे.

मदतीसाठी मानले लोकांचे आभार
राजेश करीर यांनी फेसबुकवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते लोकांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी ते काहीसे इमोशनल झाले आहेत. त्यांनी असं म्हटलं आहे की, आता माझ्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवणं बंद करा. कारण मल माध्या औकातीपेक्षा जास्त मदत केली आहे.

‘मला जगायचं आहे, मला मदत करा’
लोकांना मदत करण्याचं आवाहन करत जो व्हिडीओ त्यांनी पूर्वी शेअर केला होता त्या व्हिडीओत राजेश म्हणत आहेत की, जर मी लाजलो तर हे आयुष्य मला खूप महागात पडेल. मला एवढीच विनंती करायची आहे की, मला मदतीची खूप गरज आहे. अवस्था खूपच नाजूक झाली आहे. तुम्ही 300, 400, 500 रुपये जेवढे शक्य असतील मला मदत करा. शुटींग कधी सुरू होईल काहीच माहिती नाही. काम मिळेल किंवा नाही काहीच माहिती नाही. लाईफ एकदम ब्लॉक झाली आहे. काहीच समजत नाहीये. मला जगायचं आहे.” बोलताना त्यांचे डोळेही पाणावत आहेत. त्यांनी सोबत बँक खात्याचा तपशील आणि मोबईल नंबरही दिला आहे.

रजेश करीर मुळचे पंजाबचे आहेत. 15-16 वर्षांपासून मुंबईत आपल्या कुटुंबातसोबत राहतात. बेगुसराय या मालिकेचं प्रसारण 2015-16 सालच्या दरम्यान सुरू झालं होतं. या शोमध्ये श्वेता तिवारी आणि विशाल आदित्य सिंह असे कलाकारही दिसले होते.