Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा रंगली आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले असतानाच ब्रिटन (Britain) आणि अमेरिकेतही (America) याचे प्रमाण आहे. आता भारतातही (India) काही प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटांपासून सध्या महाराष्ट्रासह (Maharashtra) देश सावरला आहे. आता मंकीपॉक्समुळे चिंता वाढलीय. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

 

राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, “मंकीपॉक्स हा दक्षिण आफ्रिकेतून येणारा आजार आहे. ब्रिटन, अमेरिका या देशांमध्ये मंकीपॉक्सच्या काही केसेस आढळल्या आहेत. परंतु, आपल्या देशात एकही मंकीपॉक्सची केस आढळली नसल्याचं,” ते म्हणाले.

पुढे राजेश टोपे यांनी सांगितले की, ”हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने पसरतो. पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणं आहेत. साधारण दोन ते चार आठवडे हा आजार राहू शकतो. याचा मृत्यूदर 1 टक्के ते 10 टक्क्यांपर्यंत असल्याचं अभ्यासकांचे मत आहे. एक ते दोन दिवस पुरळ आणि ताप येण्याच्या दरम्यान हा आजार दुसऱ्यांना होण्याची शक्यता असल्याचं,” ते म्हणाले.

 

”भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण न आढळल्याने काळजी करण्याचं कारण नाही.
एकही केस भारतात आढळलेली नाही. प्रादुर्भाव असलेल्या देशातून आपल्याकडे येणाऱ्या लोकांचं विमानतळावर स्क्रिनिंग केलं जातं आहे.
काही लक्षणं आढळली तरी त्यांचे स्वॅब NIP ला पाठवतो.
मुंबईत कस्तुरबा गांधी रुग्णालयात एक स्वतंत्र वॉर्ड आणि डॉक्टरांची टीम तयार असल्याचं,” ते म्हणाले.
तसेच, ‘काही लक्षणं आढळत असतील, तर लोकांनी तपासणी करून घ्यावी.
हवेतून प्रसार होत नसल्यामुळे लागण होण्याचं प्रमाण फार असू शकत नाही.’ अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.

 

Web Title :- Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा