Rajesh Tope | सेवानिवृत्त होणाऱ्या डॉक्टरांबाबत आरोग्यमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण विधान; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajesh Tope | डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) वाढवले आहे. त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या डॉक्टरांना मुदतवाढ मिळणार का ? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. मात्र आता या प्रश्नावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका खासगी कार्यक्रमात बोलताना उत्तर दिले आहे. ”जे डॉक्टर सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत त्यांना 31 मे नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. येत्या काळात नव्या पिढीला संधी देण्यात येणार असल्याचे,” त्यांनी सांगितले.

 

राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, ”यापूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या डॉक्टरांच्या अनुभवाची गरज होती म्हणून त्यांना मुदतवाढीसाठी ग्राह्य धरण्यात आले होते.
परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची सबब देऊन चालणार नाही.
सरकारविरोधात अवमान याचिका दाखल झाली आहे. नवीन भरतीची प्रक्रियाही सरकारने सुरू केली आहे.
त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या जागी लवकरच नवीन पिढी येईल.
कित्येक वर्षे पदोन्नतीसाठी प्रतीक्षा करणारे अधिकारी आहेत, नव्याने घडणारे अधिकारी आहेत. या सर्वांना संधी देण्यात येणार आहे.”

 

Web Title :- Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope said retiring doctors do not have extensions

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा