दिल्ली विधानसभा : महाराष्ट्रातील ‘या’ युवा नेत्याकडे काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने छाणणी समितीच्या अध्यक्षपदी माजी खासदार आणि महाराष्ट्रातले युवा नेते राजीव सातव यांची निवड केली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांच्या नजरा दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत. 15 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेचा कालावधी संपत असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तिकीट वाटपासाठी छाननी समितीची जबाबदारी राजीव सातव यांच्याकडे सोपवली आहे.

राजीव सातव हे सध्या गुजरातचे प्रभारी म्हणून काम पहात आहेत. यावेळी लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली नसली तरी काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत सध्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष असताना आणि सध्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी या दोघांच्याही विश्वासू गोटातील राजीव सातव यांचे स्थान आहे.

दिल्ली विधासनभेच्या एकूण 70 जागा आहेत. मागच्या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळे यावेळी काँग्रेसने कामगिरी कशी असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आम आदमी पक्षाने मागच्या निवडणुकीत 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या. गेल्या अनेक राज्याच्या निवडणुकांमध्ये भाजपची पीछेहाट होत चालली आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये हे चक्र थांबवण्यासाठी भाजपकडून शर्तीचे प्रयत्न केले जातील. त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/