Rajkot TRP Game Zone Fire | गुजरात राजकोटच्या गेमझोनमध्ये भीषण आग, 12 लहान मुलांसह 32 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : Rajkot TRP Game Zone Fire | गुजरातच्या राजकोटमध्ये काल टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत ३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेप्रसंगी गेमझोनमध्ये मोठी गर्दी होती, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात येणार आहे, तसेच मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भीषण आगीमुळे इमारत कोसळली आणि त्याखाली लोक गाडले गेले. त्यामुळे आगीने आणखी रौद्ररूप धारण केले. या गेमिंग झोनला अग्निशमन विभागाकडून एनओसी मिळालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

या दुर्घटनेबाबत माहिती देताना राजकोटचे जिल्हाधिकारी प्रभाव जोशी म्हणाले,
आम्हाला साडेचार वाजता आग लागल्याची माहिती मिळाली,
तात्काळ रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे.
येथील टीआरपी गेमिंग झोन पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आगीत ३२ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCMC News | मंगळसूत्र विकून, सोने गहाण ठेऊन पूर रेषेतील बांधकामांसाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप

Ravindra Dhangekar On Ajit Pawar | पोर्शे कार अपघातावरून धंगेकरांचा अजितदादांवर निशाणा,
”त्यांची भाषा सैल झालीय, फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीत ठेवलंय” (Video)

Porsche Car Accident Pune | सुरेंद्रकुमार अग्रवालने ड्रायव्हरला खोलीत डांबले; ड्रायव्हरच्या बायकोने आरडाओरडा केल्यानंतर सुटका (Videos)