फ्रान्सनं भारताकडं सोपवलं पहिलं वहिलं ‘राफेल’, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांनी केलं शस्त्र पूजन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी देशासाठी पहिलं राफेल जेट ताब्यात घेतलं. यासाठी ते फ्रेंच मिलिट्री एअरक्राफ्टने मेरीग्नॅकमध्ये पोहोचले. बोर्डोक्समध्येच त्यांनी दसऱ्याच्या निमित्ताने शस्त्रपूजा केली. यावेळी अनेक अधिकारी तेथे उपस्थित होते. हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

राफेल घ्यायला गेलेले राजनाथ सिंह म्हणाले, “आज राफेल विमान भारतात येत आहे याचा मला आनंद होत आहे. राफेलमुळे आपल्या वायुसेनेचे ताकद वाढेल असा मला विश्वास आहे. मला आशा आहे की दोन मोठ्या लोकशाहींमध्ये सर्व क्षेत्रात सहकार्य वाढेल. भारत-फ्रान्स राजकीय भागीदारीत एक नवीन मैलाचा दगड दिसतो आहे.”

पुढे ते म्हणाले की, “आज भारतात दसऱ्याचा सण साजरा केला जात आहे. हा सण विजयादशमी म्हणून ओळखला जातो. यात आम्ही वाईटावर चांगल्याचा झालेला विजय साजरा करतो. याशिवाय हा 87 वा वायुसेना दिवसही आहे. त्यामुळे हा दिवस अनेक प्रकारे प्रतिकात्मक आहे.”

 

Visit  :Policenama.com