Homeताज्या बातम्याRaju Srivastava Health Update | हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर सुद्धा आली नाही राजू...

Raju Srivastava Health Update | हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर सुद्धा आली नाही राजू श्रीवास्तवला शुद्ध, प्रकृती अतिशय चिंताजनक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Raju Srivastava Health Update | प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव हे येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. रुग्णालयाच्या सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. स्टँड-अप कॉमेडियन (58) यांना बुधवारी हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच दिवशी त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. सूत्रांनी सांगितले की, श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. रूग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांना शुद्ध आलेली नाही. (Raju Srivastava Health Update)

 

राजू यांच्यावर एम्समधील कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. नितीश नाईक उपचार करत आहेत. शुक्रवारी रात्री श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक निवेदन जारी केले की, राजू श्रीवास्तवची प्रकृती स्थिर आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत आणि सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. सर्व शुभचिंतकांचे त्यांच्यावरील निरंतर प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. कुटुंबाने लोकांना ’कोणत्याही अफवा किंवा खोट्या वृत्तांकडे लक्ष देऊ नका, अशी विनंती केली. येथील एका हॉटेलच्या जिममध्ये व्यायाम करत असताना कॉमेडियनला हृदयविकाराचा झटका आला. (Raju Srivastava Health Update)

 

श्रीवास्तव 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून मनोरंजन जगतात सक्रिय आहेत. 2005 मध्ये ’द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँड-अप कॉमेडी शोच्या पहिल्या सत्रात भाग घेतल्यानंतर त्यांना ओळख मिळाली. त्यांनी ’मैने प्यार किया’, ’बाजीगर’, ’बॉम्बे टू गोवा’ (रिमेक) आणि ’आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते ’बिग बॉस’ सीझन 3 च्या स्पर्धकांपैकी एक आहेत. श्रीवास्तव हे उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्षही आहेत.

 

पंतप्रधान मोदींनी घेतली माहिती

पीएम मोदींनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांच्याशीही चर्चा केली.
तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
पंतप्रधानांपूर्वी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांशी बोलून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

 

Web Title : –  Raju Srivastava Health Update | bollywood comedian actor raju srivastava condition is critical on ventilator

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News