Rajya Sabha Election 2022 | ‘सकाळपासून ‘ऑफर’ चं राजकारण ! अखेर राज्यसभा निवडणूक होणार; भाजप-शिवसेनेत चुरशीची लढत अटळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajya Sabha Election 2022 | राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election 2022) बिनविरोध व्हावी यासाठी राज्यातील महविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. यावेळी भाजपने महाविकास आघाडीचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. भाजपचा तिसरा उमेदवार मागे घेणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे आता सहाव्या जागेसाठी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी 3 वाजेपर्यंत होती. मात्र, कुठल्याही उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला नाही. या पार्श्वभूमीवर आता राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election 2022) होणार हे स्पष्ट झालं आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुक बिनविरोध करण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्नं अयशस्वी झाल्याचे दिसते आहे. कारण दोन्ही पक्ष आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची ऑफर भाजपने धुडकावली आहे. तर भाजपची ऑफर आघाडी सरकारने धूडकावल्याचे चित्र दिसत आहे.

 

दरम्यान, राज्यसभा निवडणूक होणारच आहे तर त्या पाठोपाठ विधान परिषदेसाठीही प्रत्यक्ष मतदान होणार आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची संध्याकाळी 6 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राज्यसभेच्या निवडणुकीबाबत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांसमवेत चर्चा करणार असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, राज्यसभेसाठी 10 जून रोजी होणा-या निवडणूकीत भाजप मैदान मारणार का ? शिवसेना ? याची उत्सुकता आता संपूर्ण राज्याला असणार आहे.

महाविकास आघाडी सरकारची भाजपला ऑफर –
भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केल्यास त्याची परतफेड विधान परिषद निवडणुकीत केली जाईल. त्यानुसार, विधान परिषद निवडणुकीत मविआकडून भाजपला आणखी 1 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. विधान परिषदेसाठी 10 जागांवर निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार भाजपच्या ४ जागा निश्चित समजल्या जाताहेत. मविआकडून भाजपला 5 वी जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

 

भाजपकडून महाविकास आघाडीला ऑफर –
3 रा उमेदवार कायम ठेवण्याच्या भूमिकेवर भाजप ठाम राहिले आहे.
भाजपने महाविकास आघाडीने राज्यसभा निवडणूक बिनविरोध केल्यास विधान परिषदेसाठी 5 वी जागा लढवणार नसल्याचे म्हटले होते.
भाजपने दिलेल्या या प्रस्तावावर महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला.
मात्र, शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे.

 

Web Title :- Rajya Sabha Election 2022 | rajya sabha election 2022 shiv sena and bjp both will not withdraw their candidates

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा