Rajya Sabha Elections 2022 | राज्यसभा निवडणूक ! 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात, आज फैसला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajya Sabha Elections 2022 | राज्यसभा निवडणुकीमध्ये (Rajya Sabha Elections 2022 ) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपने (BJP) विजय आमचाच होणार असा दावा केला आहे. त्यातच सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अटीतटीची होणार आहेच. पण कोणाचा पत्ता कट होणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आज सकाळी विधानभवनात मतदानाला सुरुवात होत आहे. तर रात्री 8 पर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

 

प्रत्येक पक्ष आपल्या आमदाराचे मत बाद होऊ नये याची पुरेपूर खबरदारी घेत आहे. मतदान कसे करायचे, दुसऱ्या पसंतीचे मतदान करताना कोणती खबरदारी घ्यायची हे आमदारांना सांगतानाच रंगीत तालीम देखील घेण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपकडून आमदारांची पळवापळवी होऊ शकते ही शक्यता गृहीत धरून महाविकास आघाडीने चांगलीच फिल्डिंग लावली आहे. (Rajya Sabha Elections 2022)

 

देशमुख, मलिक यांच्या मतदानाचा आज फैसला –
शिवसेनेचे रमेश लटके (Ramesh Latake) यांच्या निधनाने विधानसभेत 287 सदस्य आहेत. मतदान करण्यासाठी कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली असून त्यावरही आज सकाळी निर्णय होणार आहे. त्यामुळे जर या दोघांना मताधिकार मिळाला नाही तर पहिल्या पसंतीच्या मताचा कोटा 41 इतका असेल. जर समजा मताधिकार मिळाला तर हा कोटा 42 चा होईल.

 

काँग्रेसच्या आमदारांची बडदास्त –
महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर हे सर्व नेते आमदारांचा मुक्काम असलेल्या ठिकाणी पोहोचले. तेथे आमदारांशी चर्चा केली. खरगे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या नेत्यांनी राष्ट्रपती निवडणुकीसोबतच राज्यसभा निवडणुकीबाबत शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली असल्याची महितो सूत्रांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन –
ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये भाजप आणि त्यांना बरोबर जाणारे अपक्ष आमदार मुक्कामी आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोरोना चाचणी केली.
चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर ते या हॉटेलमध्ये आले. त्यांनी येथे आमदारांना मार्गदर्शन केले.

 

रिंगणातील उमेदवार –

भाजप : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक

शिवसेना : संजय राऊत आणि संजय पवार

राष्ट्रवादी : प्रफुल्ल पटेल

काँग्रेस : इम्रान प्रतापगडी

 

Web Title :- Rajya Sabha Elections 2022 | rajya sabha election today 7 candidates in the fray for 6 seats in maharashtra marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajya Sabha Election 2022 | ‘महाविकास आघाडीतला एक ‘संजय’ जाणार’ – भाजपा नेत्याचं मोठं विधान

 

Bombay High Court-Nagpur Bench | ‘प्रेमसंबंध तोडणे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे’ – उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

 

Maharashtra School Start | चला प्तर भरा ! शैक्षणिक वर्ष 13 जूनपासून तर शाळा 15 जूनला सुरू होणार