काय सांगता ! होय, दिव्याऐवजी पेटवली सिगरेट, राम गोपाल वर्मा पुन्हा ‘गोत्यात’

 पोलीसनामा ऑनलाइन –देशभरातील कोरोनाचा विळखा घट्ट झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला रविवारी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाइट बंद करत नऊ मिनिटांसाठी दिवा लावून एकतेेचे दर्शन घडवण्याचे आवाहन केले होते. मात्र, चित्रपटांसोबतच वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांनी मात्र जरा वेगळाच फोटो पोस्ट केला. त्यामुळे राम गोपाल वर्माची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

कोरोनाला हरविण्यासाठी मोदींनी केलल्या आवाहनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. सामान्य जनतेसह अनेक बॉलिवूडमधील मंडळींनीही आपल्या घराच्या गॅलरी, खिडकी, दरवाजात दिवा लावून एकतेचा संदेश दिला. काही कलाकरांनी दिवे लावतानाचे आपले फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले. पण, वर्मा यांनी रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सिगारेट पेटवतानाचा फोटो ट्विट केला. या फोटोसोबत त्यांनी ‘धूम्रपानाबाबत सरकारच्या धोक्याच्या सूचनांचे पालन न करण्यापेक्षा कोरोनाबाबतच्या धोक्याच्या सूचनांचे पालन न करणे अधिक धोकादायक आहे’, अशा आशयाचे ट्विट केले आहे.

शिवाय सिगारेट पेटवतानाचा एक व्हिडिओही पोस्ट केला. राम गोपाल वर्माने हे ट्विट केल्यापासून त्यावर नेटकर्‍यांच्या विविध प्रतिक्रिया येत असून ट्रोल करण्याचाही प्रयत्न होत आहे. यापूर्वी एक एप्रिल रोजीही राम गोपाल वर्माने स्वतःला कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट केले होते. पण, नंतर ‘डॉक्टरांनी मला एप्रिल फूल बनवले असे ट्विट त्यांनी केले होते. त्यावरुनही नेटकर्‍यांनी वर्मा यांना सुनावले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like