CBSE 10th Result : सोशल मीडियात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका

निकालाची तारीख लवकर जाहीर करू : सीबीएसई बोर्ड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या (सीबीएसई) बोर्डाचा १२ वीचा निकाल लागल्यानंतर दोन ते तीन दिवसांपर्यंत १० वीचा निकाल ही जाहीर करण्यात येत असतो. पण यावेळी मात्र कोणत्याही प्रकारची सूचना सीबीएसीई बोर्डाकडून देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियात निकालाविषयी अनेक अफवा पसरू लागल्या आहेत. सीबीएसईच्या दहावीच्या निकालाची तारीख लवकर अधिकृतपणे जाहीर होणार आहे घोषणा बोर्डाकडून करण्यात आली आहे. सोशल मीडियात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आव्हान सीबीएसई बोर्डाचे जनसंपर्क अधिकारी रमा शर्मा यांनी केले आहे.

१२ वीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा निकाल जाहीर करण्यापूर्वी सीबीएसई बोर्डाने कोणतीही आधी सूचना न देता अचानक निकाल जाहीर केला होता. त्यामुळे आज दहावीचा निकाल लागू शकतो अशी बातमी सोशल मीडियावर येत होती. सीबीएसई बोर्डाच्या पीआरओ रमा शर्मा यांनी सांगितले की, ‘सोशल मिडीयावर निकालासंदर्भात पसरवण्यात येणाऱ्या सर्व बातम्या ह्या खोट्या आहेत. सीबीएसई बोर्डाकडून निकालासंदर्भात योग्य ती माहिती पुरवण्यात येईल. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मात्र अद्यापही निश्चित तारीख सांगण्यात आलेली नाही.’

या साईटवर करा निकाल चेक –
बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून cbseresults.nic.in आणि cbse.nic.in निकाल पाहता येईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like