एकाच फ्रेममध्ये दिसले ‘रामायण’चे ‘राम-लक्ष्मण’ ! सुनील लहरींनी शेअर केला ‘अनसीन’ फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रामानंद सागर यांची डीडीवरील रामायण ही मालिका संपली आहे. तरीही मालिकेशी संबंधित अनेक किस्से समोर येताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रामायणमधील लक्ष्मण सुनील लहरी अनेक किस्से शेअर करत आहेत. काही व्हिडीओ आणि फोटोही सोशलवर शेअर करत आहेत. सुनील लहरी यांनी अलीकडेच एक थ्रोबॅक फोटो शेअर केल आहे जो खूप चर्चेत आला आहे.

सुनील लहरी यांनी नुकताच त्यांच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात रामायणचे राम अरुण गोविलही आहेत. ब्लॅक अँड व्हाईट असणारा हा फोटो एक थ्रोबॅक फोटो आहे. सुनील यांनी सांगितलं की, हा रामायणच्या शुटींगच्या वेळचा फोटो आहे. यात अरुण गोविल तर ओळखूही येत नाहीत.

लुकबद्दल बोलायचं झालं तर दोघंही जीन्स आणि टीशर्टवर दिसत आहेत. फोटो शेअर कताना लहरी म्हणतात, “मोठ्या भावाचं प्रेम दाखवताना रामजी. रामायणच्या शुटींगच्या सेटबाहेरील फोटो आहे हा.”

सुनील लहरी यांनी शेअर केलेला हा थ्रोबॅक फोटो चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत दोघांचं कौतुक केलं आहे. काहींनी हा फोटो शेअरही केला आहे.