रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील खेड मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी रामदास कदम (Ramdas Kadam), शिंदे गट आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला होता. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी रविवारी (दि.19) खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी जय्यत तयारी केली आहे. विशेष म्हणजे ज्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा झाली होती त्याच मैदानावर एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे. मात्र सभेपूर्वीच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी विरोध करत शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. सभा कशाला घेत आहात. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, त्यावर बोलायला पाहिजे, असा सल्ला भास्कर जाधव यांनी दिला. यावरुन रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवराळ भाषेत भास्कर जाधव यांच्यावर टीका केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
…म्हणून तो कुत्र्यासारखा बेफाम भुंकतोय
भास्कर जाधव यांना उद्देशून रामदास कदम म्हणाले, अरे अजून सभाच झाली नाही. तर कशावर बोललं पाहिजे? हे तुम्ही कसं ठरवणार. आधी सभा तरी होऊ द्या मग कोण कशावर बोललं, हे तुम्हाला समजेल. भास्कर जाधव हा नुसता कुत्र्यासारखा भुंकतोय. त्याच्याकडे लक्ष देयला आमच्याकडे वेळ नाही. त्याचा तोल गेला असून त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मी स्वत: भास्कर जाधवांच्या मतदारसंघात लक्ष घातले आहे. माझ्याकडे दोन वर्षे आहेत. आता मी त्याला गाडणारच आहे, हे त्याला समजले आहे. म्हणून तो कुत्र्यासारखा बेफान भुंकतोय, मी त्याच्याकडे लक्ष देत नाही, अशा शब्दांत कदमांनी टीकास्त्र सोडलं.
…कारण तुझी औकात नाही
राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पुढील निवडणुकीत हे थांबलं पाहिजे असे भास्कर जाधव यांनी म्हटले होते.
यावर बोलताना रामदास कदम म्हणाले, अरे तू थांबलास किंवा नाही थांबलास… तरीही मी तुला गाडणारच आहे.
कारण तुझी औकात नाही, तुझी लायकी नाही. तू नीच आहेस, तू महानीच आहेस. तुझा मेंदू सडलेला आहे.
तू वाटेल ते बडबडतोस. तुला उपकाराची जाणीव नाही. ज्या थाळीत खाल्ल तिथेच तू छेद करतो, असा तू नालायक माणूस आहेस. त्यामुळे तुला पुन्हा विधिमंडळात जाण्याचा नैतिक अधिकार नाही. तुला मी गाडणार एवढं 100 टक्के नक्की आहे, असा सज्जड दमच रामदास कदम यांनी भास्कर जाधवांना दिला आहे.
Web Title :- Ramdas Kadam | shinde group leader ramdas kadam on bhaskar jadhav barking like dog khed speech
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chhagan Bhujbal | ‘फडणवीसांना ‘या’ पदावर बघायला आवडेल’, छगन भुजबळांनी सांगितली ‘मन की बात’
Pune Crime News | शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून आरोपीचा पलायन करण्याचा प्रयत्न, पण…