वाळवंटात राणी मुखर्जी करतेय खलनायकाचा पाठलाग ! लवकरच ‘मर्दानी 2’ प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आगामी चित्रपट ‘मर्दानी 2’मध्ये राणी मुखर्जी निर्भीड आणि वचनबद्ध पोलीस निरीक्षक शिवानी रॉयच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची शुटींग राजस्थानमध्ये सुरु आहे.

‘मर्दानी 2’ च्या प्रीक्वेलमधील राणीची भूमिका सुपरहिट ठरली होती. आणि यासाठी तिचे खुप कौतुक झाले होते. आता आदित्य चोप्रा निर्मित राणीचे दर्शन पुन्हा तिच्या चाहत्यांना घडणार आहे. ‘मर्दानी’ चित्रपटाचा लेखक गोपी पुथरन ‘मर्दानी 2’ दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.

एका सुत्राने सांगितले की, जीवघेण्या उन्हात राणीला अपराधाच्या मागे पाठलागाचे शुटींग करावे लागणार होते. राणी दृश्याचे चित्रीकरण एका टेकमध्ये संपवते, अशी तिची ख्याती आहे. परंतू, दृश्ये पाठलागाची असल्यामुळे आम्ही आणखी १ ते २ वेळा शुटींग करावे असे राणीचे म्हणणे होते. जेणेकरुन आम्हाला वेगवेगळ्या शॉट्स मिळतील.

उन खुप असायचे आणि ती डीहायड्रेड व्हायची. मात्र, तिने प्रत्येक टेक पुर्ण केला. स्वतःच्या कामाप्रती तिची असलेली निष्ठा क्रूमधील प्रत्येकाला प्रोस्ताहित करायची. शुटींगमधील कोणालाच इतक्या जहाल उन्हाची सवय नव्हती. परंतू राणीची वचनबद्धता सर्वांनाच उत्साही करत असे.

सध्या तेथील तापमान ४० डिग्रीवर गेले आहे. काही दिवसात ४३ डिग्रीवर पारा जाईल, अशी चिन्हे दिसत आहे. अशा भर उन्हात सूर्य आग ओकत असताना शुटींग करणे फारच जिकिरीचे आहे. सर्वच दृश्यांमध्ये राणी भयंकर अपराधाचा पाठलाग करताना दिसत आहे. पाठलागाची ही सर्वच दृश्ये सर्वात उष्ण दिवसांत शूट करण्यात येत आहे. या चित्रपटात राणीच्या विरोधात कोण खलनायक असणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

Loading...
You might also like