महिलेच्या मदतीने नराधमाने केला अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

कळंब : पोलीसनामा ऑनलाईन – अल्पवयीन मुलीस घरी आणि शेतात बोलावून तिच्यावर जबरदस्तीने दुष्कर्म करणार्‍या नराधमासह या गुन्ह्यात आरोपीला मदत करणार्‍या महिलेविरूध्द कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तालुक्यातील मस्सा खं. येथील दोनही आरोपींविरूध्द कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांमधून होत आहे.
कळंब तालुक्यातील मस्सा खं. येथे 15 जानेवारी रोजी सायंकाळी 7 ते 8 च्या दरम्यान शेतातील वस्तीवर एका महिलेने पीडित अल्पवयीन मुलीस घरी बोलावले. मुलगी तिच्या घरी येताच घराचा बाहेरून दरवाजा बंद केला आणि गावातील बालाजी रमेश शिंगोटे या नराधमाने या मुलीला विवस्त्र करून तिचे मोबाइलवर छायाचित्र काढून समाजमाध्यमात पसरविण्याची धमकी दिली. आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. बदनामीच्या भीतीमुळे पीडित मुलीने या संतप्त घटनेची घरी कोणासही माहिती सांगितली नव्हती. त्यानंतर 8 फेब्रुवारी रोजी पुन्हा दोन ते तीन वेळा पीडित मुलीवर ज्वारीच्या पीकात बोलावून जबरदस्तीने अत्याचार केला. हा किळसवाणा अत्याचार सहन न झाल्याने पीडित मुलीने धाडस करत शनिवार, 23 फेब्रुवारी रोजी कळंब पोलीस ठाणे गाठले आणि सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानुसार बालाजी शिंगोटे या नराधमासह त्याला या गुन्ह्यात मदत करणार्‍या एका महिलेविरूध्द बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस घेत असून या घटनेचा ग्रामस्थांमधून संताप व निषेध व्यक्त होत आहे. नराधमासह त्याला या प्रकरणात मदत करणार्‍या महिलेविरूध्द कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
आलूरमध्ये महिलेचा विनयभंग – घरात कोणी नसल्याचा फायदा घेत गावातीलच दोन आरोपींनी महिलेचा विनयभंग केल्याची घटना शनिवार, 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. आलूर येथील पीडित महिला ही शनिवारी घरी एकटीच होती. सायंकाळी 6 वाजता अजय अविनाथ कांबळे व अविनाश येल्लपा कांबळे हे दोघे उमरगा येथे पीडित महिलेच्या घरात येवून मुले, पती कुठे आहेत, तू घरात एकटीच आहेस का, असे म्हणून पीडित महिलेचा हात धरून तिचा विनयभंग केला. अश्लिल बोलून लाथाबु्न्नयांनी मारहाणही केली.  घडलेला प्रकार पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देणार्‍या आरोपींविरूध्द पीडित महिलेने मुरूम पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडला प्रकार पोलिसांना सांगितल्यानुसार अजय कांबळे व अविनाश कांबळेविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.