फेक फॉलोअर्स प्रकरण : रॅपर ‘बादशाह’नं केले गुन्हे शाखेकडे अत्यंत ‘धक्कादायक’ खुलासे, जाणून घ्या

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : गायक बादशाहने आपल्या दोन दिवसांच्या चौकशीदरम्यान गुन्हे शाखेसमोर अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. सर्वात मोठा खुलासा त्यांच्या ‘पागल है’ गाण्याबद्दल आहे. बादशाहने असा दावा केला की गाणे लाँच झाल्याच्या पहिल्याच दिवशी या गाण्यास सुमारे 7.5 कोटी लोकांनी पाहिले होते आणि हा जागतिक विक्रम आहे, परंतु तरीही गुगलने हा दावा मान्य केला नाही.

आता गुन्हे शाखेकडे दिलेल्या आपल्या स्टेटमेंटमध्ये बादशाहने कबूल केले आहे की या गाण्याचे फेक फॉलोअर्स वाढविण्यासाठी त्याने एका एजन्सीला सुमारे 75 लाख रुपये दिले होते. हे गाणे आतापर्यंत सुमारे 27 कोटी लोकांनी पाहिले आहे. तसेच चॅटरबॉक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणय स्वरूप हे देखील या प्रकरणी अडचणीत सापडले आहेत.

चॅटरबॉक्सने आपल्याच एका टूल बूमबॉक्स (Boombox) मध्ये विराट कोहली, प्रियांका चोप्रापासून ते बादशाहपर्यंत अनेकांना आपले क्लाइंट असल्याचे सांगितले आहे. पण बादशाह गुन्हे शाखेच्या समोर आल्यानंतर आता त्यांच्या प्रोफाइलला हटविण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार यात अनेक सेलिब्रिटींची फेक प्रोफाइल लावण्यात आली आहेत. प्रणय स्वरुपने गुन्हे शाखेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांचे मासिक उत्पन्न सुमारे 9 कोटी रुपये असून सुमारे 30,000 च्या आसपास त्यांचे ग्राहक आहेत.