किशोर कुमारच्या ‘या’ सिनेमावर कोर्टानं आणली होती ‘बंदी’, आता 60 वर्षानंतर मिळाली ‘रील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नॅशनल फिल्म आर्काइव ऑफ इंडिया (NFAI)ला 1957 साली बॅन झालेल्या बेगुनाह सिनेमाची रील (प्रिंट) मिळाली आहे. 60 वर्षांपूर्वी बॉम्बे हायकोर्टानं या सिनेमाच्या सर्व प्रिंट्स रद्द करण्याचे आदेश दिले होते. आता एवढ्या वर्षांनी या सिनेमाची प्रिंट मिळणं म्हणजे एक चकित करणारी बाब आहे. गेल्या आठवड्यात मिळालेल्या या क्लिपमध्ये दिसत आहे की, अ‍ॅक्ट्रेस शकीला सिनेमात डान्स करतआहे तर म्युझिक कंपोजर जयकिशन पियानो वाजवत आहेत. सोबतच या सिनेमात मुकेश कुमार ऐ प्यासे दिल बेजुबांची प्लेबॅक सिंगिंग करत आहेत.

पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, NFAI चे संचालक प्रकाश सांगतात, “लोक अनेक वर्षांपासून या रीलच्या (प्रिंट) शोधात होते. या रिल्स आमच्याकडे नव्हत्या. अशात आम्हीही त्याचा शोध घेत होतो. हे मिळणं आमच्यासाठी चमत्कार आहे. हा सिनेमा ज्यांना आवडला होता त्यातील काहींकडे सिनेमाच्या प्रिंट्स होत्या.”

प्रकाश यांनी सांगितलं की, “जयकिशनला लाईक करणारे आजही या सिनेमाच्या शोधात होते. कारण हा असा सिनेमा आहे ज्यात त्यांची जास्त प्रमाणात अदाकारी आहे. 16 MS च्या दोन रिल्स मिळाल्या आहेत ज्या 60 ते 70 मिनिटांच्या आहेत. एक रिल दोन महिनेअगोदर आली आणि एक गेल्या आठवड्यात. रिल्स अवस्था काही ठिक नाहीये. परंतु गाणं चालू आहे.” असंही ते म्हणाले.

सिनेमाच्या सर्व प्रिंट्स नष्ट करण्याचा होता आदेश
1957 साली आलेल्या या सिनेमाविरोधात एक अमेरिकन कंपनी पॅरामाऊंटन पिक्चर्स न्यायालयात गेली होती. कंपनी असा आरोप केला होता की, 1954 मध्ये त्यांनी बनवलेल्या Nock O)n Wood या सिनेमाची ही कॉपी आहे. यानंतर बॉम्बे हायकोर्टानं पॅरामाऊंटनंच्या बाजून निकाल देत निर्णय सुनावला होता. कोर्टानं आपल्या आदेशात असंही म्हटलं होतं की, सिनेमाच्या सर्व प्रिंट नष्ट करण्यात याव्यात.