Rashmi Shukla-Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, कलमवाढ होण्याची शक्यता; रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rashmi Shukla-Phone Tapping Case | फोनटॅपिंग प्रकरणात पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला  (IPS Rashmi Shukla) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांनी अंमली पदार्थाच्या टोळीचे रॅकेट उघडकीस आणण्याचे कारण सांगून परवानगी न घेताच, ग्राहक अर्ज आवेदन पत्र अपर मुख्य सचिव गृह (Chief Secretary Home) यांच्याकडे सादर केले नाही. अन्यथा फोन टॅपिंगची (अभिवेक्षण) परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला कोणाचा फोन टॅप (Rashmi Shukla-Phone Tapping Case) करायचा आहे याची माहिती मिळाली असती. तसेच मोबाईल वापरकर्त्यांची नावे देखील अभिवेक्षणाची व फेर अभिवेशणाची मंजुरी घेताना सादर केली नसल्याचे निष्पन्न झाले.

 

रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन खासदार नाना पटोले (Nana Patole), संजय काकडे (Sanjay Kakade), आमदार बच्चु कडु (MLA Bachchu Kadu), आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांचे मोबाईल नंबर राजकीय हेतूने जाणीवपूर्वक फसवणूक करुन अभिवेक्षणाखाली (Rashmi Shukla-Phone Tapping Case) घेतले आणि हेतू पुरस्पर अभिवेशण चालू ठेवले होते. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्यासह इतरांविरुद्ध पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात कलम 26 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई शहर (Mumbai), ठाणे शहर (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai), पुणे शहर (Pune) आणि नागपूर शहर (Nagpur) यांच्याकडील फोन टॅपिंगचे प्रस्ताव हे राज्य गुप्त वार्ता आयुक्तांमार्फत Maharashtra State Intelligence Commissioner (SID) न पाठवता ते परस्पर गृह विभागाच्या मुख्य सचिवांकडे मंजुरीसाठी पाठवले जातात.

 

फोन टॅपिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य शासनाने समिती स्थापन केली. तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे (IPS Sanjay Pandey) यांच्या समितीने 2015 ते 2019 या कालावधीतील सर्व पोलीस आयुक्तालयातील फोन टॅपिंगची पडताळणी केली. यामध्ये पुणे पोलीस आयुक्तालयात 2017 ते 2018 या दरम्यान चार लोकप्रतिनिधींचे सहा मोबाईल टॅपिंग करण्याचे तपासात समोर आले. नाना पटोले आणि बच्चु कडु यांचा 18 ऑगस्ट 2017 ते 14 नोव्हेंबर 2017 या कालावधीत फोन टॅप करण्यात आला. तर खासदार संजय काकडे यांचे दोन पोन आणि आमदार आशिष देशमुख यांचा फोन 13 नोव्हेंबर 2017 ते 9 जानेवारी 2018 या कालावधीत टॅप करण्यात आला.

नाना पटोले, बच्चु कडु व आशिष देशमुख हे अंमली पदार्थाच्या अवैध विक्रीत गुंतलेल्या व्यक्ती असल्याचे नमूद करुन
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विक्री करीत असल्याचे कारण सांगून फोन टॅपिंग केले.
तर संजय काकडे हे कुख्यात गुंड बापू नायर (Bapu Nair) टोळीचा सदस्य असल्याचे दाखवून ते अनाधिकाराने जमीन बळकाविणे,
खंडणी (Ransom), दरोडा (Robbery) असे गुन्हे संघटितपणे करीत असल्याचे म्हटले होते.

 

याबाबत बोलताना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) म्हणाले,
बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणात संबंधितांची अगोदर चौकशी करण्यात येईल.
या चौकशीतून ज्या बाबी समोर येतील. त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

 

 

Web Title :- Rashmi Shukla-Phone Tapping Case | In the face of shocking information in a phone tapping case, the possibility of grafting; IPS Rashmi Shukla’s problems will increase

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP | अजित पवार यांच्या उपस्थितीत गौरव घुले यांचा ‘राष्ट्रवादी’त प्रवेश

 

Sanjay Raut | संजय राऊत फिरवणार फासा? राऊतांच्या ट्विटने सर्वांच्या नजरा आणखी एका पत्रकार परिषदेकडे !

 

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेच्या आत, रिकव्हरी रेट 98 % , जाणून घ्या इतर आकडेवारी