Rashmika Mandanna | 4 वर्षात ‘नॅशनल क्रश’ बनली रश्मिका मंदान्ना ! एका चित्रपटासाठी घेते ‘एवढे’ कोटी रुपये, जाणून घ्या रश्मिकाची ‘संपत्ती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) गेल्या चार वर्षात नॅशनल क्रश (National Crush) बनली आहे. तिने फिल्मी दुनियेत घवघवीत यश मिळवले आहे. या चार वर्षात रश्मिका मंदान्नाने (Rashmika Mandanna) तिच्या नावासोबत भरपूर संपत्तीही कमावली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीसोबतच (Tollywood Film Industry) बॉलिवूडमध्येही (Bollywood) तिचे जबरदस्त फॅन फॉलोइंग पहायला मिळतात. जरी तिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी तिची नेट वर्थ बद्दल (Net Worth) जाणून घेऊया.

 

सध्या पुष्पा (Pushpa: The Rise) चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगलाच धुमाकूळ घालत आहे. कोरोना (Corona) काळात देखील या चित्रपटाने तब्बल 300 कोटींचा टप्पा पार करत बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाची नायिका रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) असून ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

 

 

रश्मिकाची यशस्वी कारकीर्द
रश्मिकाने 2016 साली ‘किरिक पार्टी’ (Kirik Party) या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पहिल्या चित्रपटापासून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सुंदर दिसण्याने आणि दमदार अभिनयाने तिने एका मागून एक यशाच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. सध्या तिला एकापेक्षा एक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत.

एका चित्रपटासाठी एवढे मानधन
मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदान्ना एका चित्रपटात काम करण्यासाठी सुमारे 3 ते 4 कोटी रुपये घेते. रिपोर्टनुसार रश्मिका मंदान्ना हिच्याकडे 30 कोटी रुपयांची संपत्ती (Property) आहे. तिच्याकडे अलिशान व्हिला (Villa) देखील आहे, जो बंगळुरूमध्ये (Bangalore) आहे. त्याची किंमत 8 कोटी रुपये आहे. याशिवाय हैदराबादच्या गची बाओलीमध्ये (Gachi Baoli, Hyderabad) एक कोटींचा बंगला आहे. तसेच गोव्यात (Goa) देखील एक आलिशान घर आहे.

 

 

महागड्या वाहनांची मालकीण
रश्मिका अनेक महागड्या गाड्यांची मालकीण आहे. तिच्याकडे 50 लाखांची मर्सिडीज बेंझ सी-क्लास (Mercedes Benz C-Class), 40 लाखांची ऑडी क्यू 3 (Audi Q 3), टोयोटा इनोव्हा (Toyota Innova) आणि हुंदाई क्रेटा (Hyundai Creta) अशा महागड्या गाड्या तिच्याकडे आहेत. रश्मिकने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत 11 चित्रपट केले. तिच्या शानदार चित्रपट कारकिर्दीच्या जोरावर ती अनुष्का शेट्टीलाही (Anushka Shetty) स्पर्धा देते. नुकताच तिचा पुष्पा रिलीज झाला आहे.

 

 

मिशन मजनू मध्ये डेब्यू
रश्मिका तिच्या ‘मिशन मजनू’ या डेब्यू चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत (Siddharth Malhotra) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
शंतनू बागची (Shantanu Bagchi) दिग्दर्शित ‘मिशन मजनू’ (Mission Majnu) यावर्षी 13 मे रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे.
तर ‘गुडबाय’ या दुसऱ्या चित्रपटात ती बॉलीवडचे बीग-बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सोबत दिसणार आहे.

 

 

Web Title :- Rashmika Mandanna | Rashmika Mandanna became National Crush in 4 years! Takes crores of rupees for a movie, find out Rashmika’s wealth

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Horoscope (Rashifal) | बुध, शनी आणि सूर्य एकाच राशीत आल्याने ‘या’ राशींचे भाग्य उजळणार, पहा तुमचे सुद्धा बदलणार का नशीब?

 

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात चक्क जनरल स्टोअर्समध्ये गांजाची विक्री; ‘शौर्य’चा वैभव वनवे ‘गोत्यात’

 

Rohit Pawar | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर टिका करणार्‍या भाजप नेत्यांना आमदार रोहित पवार यांनी दिले ‘हे’ उत्तर