Ratnagiri District Bank Election | रत्नागिरीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मोठा झटका, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची सरशी

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे (Ratnagiri District Bank Election) निकाल समोर येत आहेत. रत्नागिरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Ratnagiri District Bank Election) सहकार पॅनेलने बाजी मारली (Sahakar Panel Wins) आहे. शिवसेना नेते उदय सामंत (Shivsena leader Uday Samant) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तानाजी चोरगे (NCP leader Tanaji Chorge) यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलचे वर्चस्व निर्माण झाले आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणेंची (Narayan Rane) सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या पॅनलचा सुपडा साफ झाला आहे.

 

रत्नागिरी सहकारी बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक झाली. 21 जगांपैकी 18 जागांवर उदय सामंत आणि तानाजी चोरगे समर्थक विजयी झाले आहेत. तर निलेश राणे यांच्या समर्थकांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे कोकणातील (Konkan) आणखी एका प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांचा दारुण पराभव झाला आहे.

 

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे अवघ्या कोकणाचं लक्ष लागलं होतं. त्यांचे निकाल आज घोषीत करण्यात आले. 21 पैकी 18 जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत सहकार पॅनलचे वर्चस्व पहायला मिळाले.

 

87 टक्के मतदान

रत्नागिरी जिल्हा बँकेसाठी 19 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया (Voting process) पार पडली. जिल्ह्यातील एकूण 871 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत 87.45 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. 21 जागांपैकी 14 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर इतर जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. 7 जागांसाठी एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

 

Web Title :- Ratnagiri District Bank Election | ratnagiri district central co operative bank election shiv sena ncp sahakar panel wins maximum seats big jolt for narayan rane Nilesh Rane-supporters-Uday Samant-Tanaji Chorge

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kangana Ranaut | कंगना रणौत विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीकडून तक्रार दाखल; म्हणाले – ‘मेंटल हॉस्पिलटमध्ये पाठवा किंवा…’

Corona Europe | ‘कोरोना’मुळे युरोपातील पर्यटनाला पुन्हा ‘ब्रेक’; ऑस्ट्रियात पुन्हा लॉकडाऊन, जर्मनीमध्येही परिस्थिती बिघडली

Gautam Gambhir | ‘आधी तुझ्या मुलांना बॉर्डरवर पाठव, त्यानंतरच…’ गंभीरनं दिला सिद्धूला सल्ला (व्हिडिओ)