‘विराट’ पाठींबा मिळालेल्या ‘या’ माजी क्रिकेटरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर अखेर रवी शास्त्री यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची निवड केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन ६ दिग्गजांमध्ये मुख्य प्रशिक्षक पदासाठी चुरस निर्माण झाली होती. अखेर रवी शास्त्री यांनी बाजी मारली.


कॅप्टन विराट कोहलीने रवी शास्त्री यांचा आग्रह धरला होता. अखेर त्याची इच्छा पुर्ण झाली आहे. न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये qकग्ज इलेव्हन पंजाबचे माजी प्रशिक्षक हेसन, ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी यांच्यासह २००७ मध्ये झालेल्या ट्वेंटी-२० वल्र्ड कप विजेत्या भारतीय संघाचे त्यावेळचे व्यवस्थापक लालचंद राजपूत, मुंबई इंडियन्सचा माजी प्रशिक्षक रॉबिन qसग आणि वेस्ट इंडिजच्या फिल सिमन्स यांनी बीसीसीआयकडे मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केले होते. सध्या रवी शास्त्री हे टीम इंडियासोबत वेस्ट इंडिजच्या दौèयावर असल्याने त्यांची मुलाखत ही व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेण्यात आली. अखेर रवी शास्त्री यांचीच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –