पोटाच्या अनेक समस्या दूर करते कच्च्या केळीची भाजी ! जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – केळी आपल्या पोटासाठी आणि वजनासाठी खूप फायदेशीर असते. यानं वजन वाढतंही आणि नियंत्रणातही राहतं. तुम्हाला माहित आहे का, कच्च्या केळीचेही शरीराला अनेक फायदे होतात. कच्च्या केळीची भाजी बनवून त्याचं सेवन केलं जातं. आज याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

काय आहेत कच्च्या केळीच्या भाजीचे फायदे ?

1) पोटाच्या समस्या – तज्ज्ञ सांगतात की, कच्च्या केळीत व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, कॉपर, व्हिटॅमिन बी 6 भरपूर प्रमाणात असतं. यानं शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. पोटदुखी किंवा सतत टॉयलेटला लागणं ही समस्या कॉमन आहे. आजकाल अनेक पोटाच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जर फायबरयुक्त कच्ची केळी खाल्ली तर पोट साफ होण्यास मदत मिळते.

2) डिप्रेशन – कच्च्या केळीत ट्रीप्टोफॉन हे तत्व आढळतं. हे तत्व शरीरात जाऊन प्रोसेस झाल्यानंतर सेरोटोनिनमध्ये रुपांतरीत होतं. सेरोटोनिन मेंदूसाठी हॅप्पी हार्मोन्स सारखं काम करतं. यानं डिप्रेशन, तणाव अशा अनेक मानसिक समस्या दूर होण्यास मदत मिळते.

3) पचनक्रिया – जर तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा कच्च्या केळीची भाजी खाल्ली तर तुम्हाला पोटासंबंधी समस्यांचा सामना करावा लागणार नाही. कारण यामुळं पचनक्रिया चांगली राहते. पोट चांगलं राहिल्यानं अनेक समस्यांपासून तुम्ही दूर राहता.

4) डायरियापासून बचाव – जर कच्च्या केळीचं सेवन केलं तर डायरिया सारख्या आजारापासून लगेच आराम मिळतो. कारण यामुळं पचनक्रिया चांगली राहते. यात फायबर आणि पाण्याचं प्रमाणंही अधिक असतं. यामुळं शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. परिणामी शरीर मजबूत होण्यास मदत मिळते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.