खुशखबर ! सणासुदीपुर्वीच RBI कडून मोठं ‘गिफ्ट’, घरगुती वस्तुंच्या खरेदीसाठी ‘स्वस्त’ कर्ज मिळणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता बँका ग्राहकांना मोबाईल फोन, घरगुती उपकरणे, दुचाकी आणि तीन चाकी वाहने खरेदीसाठी अधिक कर्ज देऊ शकतील. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ग्राहकांच्या ग्राहक पत जोखीम धोरणात (Risk Weight) कपात केली आहे.

ग्राहक कर्जाच्या बाबतीत आरबीआयने बँकांना आवश्यक असणाऱ्या 125 टक्क्यांवरून 100 टक्के केले आहे. यामुळे वैयक्तिक कर्जे, ग्राहक कर्जांवरील बँकांचे व्याज कमी होईल. मात्र क्रेडिट कार्डच्या बाबतीत ही सूट देण्यात आलेली नाही.

यांना मिळणार फायदा –

या कपातीचा फायदा क्रेडिट कार्डवर उपलब्ध होणार नाही, परंतु बँका किंवा वित्तीय संस्था घरगुती उपकरणे खरेदीसाठी दिलेल्या कर्जावर हा लाभ देऊ शकतात. म्हणजेच टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉटर प्युरिफायर्स, वॉशिंग मशिन यांसारखी उत्पादने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होईल.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंतच्या निर्देशांनुसार शिक्षण कर्जाशिवाय वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड कर्जावर 125 किंवा त्याहून अधिक धोका कमी केला गेला होता, परंतु आता त्याचा आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वैयक्तिक कर्जासह सर्व ग्राहक क्रेडिट्सची जोखीम पत 100 टक्क्यांपर्यंत कमी केली जाईल, बाकीचे नियम तसेच राहतील.

रिस्क वेट म्हणजे काय ?

पत जोखिमेमध्ये (Risk Weight) बँका तारण म्हणून विशिष्ट्य गोष्टी ठेवून घेत असतात जेणेकरून भविष्यात कर्जदार दिवाळखोर घोषित झाल्यास बँकेला कोणत्याही प्रकारचे नुकसान सहन करावे लागणार नाही. वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड यासारख्या असुरक्षित मानल्या गेलेल्या सर्व कर्जासाठी आतापर्यंत कमीतकमी 125 टक्के जोखमीची पत ठेवण्याची तरतूद होती.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या