‘या’ 9 सरकारी बँका बंद करण्याच्या बातम्यांवर RBI नं दिली ‘ही’ माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था –  मागील काही महिन्यापासून सोशल मिडियावर 9 सरकारी बँका बंद होणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. परंतू यासंबंधित RBI ने स्पष्टीकरण दिले आहे की या सर्व अफवा आहेत. देशातील कोणतीही व्यवसायिक बँक बंद होणार नाही, या अफवांवर ग्राहकांनी लक्ष देऊ नका. त्यांचे पैसे बँकेत पूर्णता: सुरक्षित आहेत. मागील महिन्यातच सरकारने काही मोठ्या बँकांचे विलिनीकरण करण्याची घोषणा केली होती.

काय आहे प्रकरण –
व्हॉट्स अ‍ॅपपासून सोशल मिडियावर सध्या 9 बँका बंद होणार अशी चर्चा आहे. जर कोणाचे पैसे या बँकांमध्ये आहेत तर ते लगेचच काढून घ्या. या अफवेमध्ये 9 सरकारी बँकांची नावे देखील देण्यात आली आहेत. यात कॉर्पोरेशन बँक, IDBI, यूको, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्रा बँक, इंडियन ओवरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि युनायटेड बँक यांचा समावेश आहे. परंतू या व्हायरल मेसेजवर RBI ने स्पष्टीकरण दिले आहे की या अफवा आहेत.

वित्त सचिव राजीव कुमार यांनी आपल्या ट्विटर हँडेलवर एक फोटो शेअर करुन सांगितले की, यात सांगण्यात आलेल्या सर्व बाबी खोट्या आहेत. या अफवा आहेत. सरकार कोणतीही बँक बंद करणार नाही. सरकार बँकांचे रिफॉर्म करत आहे, बँकेत पैसे टाकून नव्या सुविधा पुरवणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच 10 सरकारी बँकांचे विलिनीकरण करण्याची घोषणा केली, ज्यानंतर सरकारी बँकांची संख्या सध्याच्या 27 वरुन 12 झाली.

 

Visit : policenama.com