‘या’ कारणामुळं RBI नं बंद केली 2000 रूपयांच्या नोटांची छपाई, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोटाबंदीनंतर सुरु झालेल्या 2000 रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेने बंद केली आहे. माहिती आधिकारात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन ही बाब उघड झाली. ही माहिती आरबीआयने दिली, या उत्तरात सांगण्यात आले की, या आर्थिक वर्षात 2000 रुपयांची एक देखील नोट छापण्यात आली नाही. परंतू या संबंधित कारण अस्पष्ट आहे. या नोटांची छपाई रोखण्यामागचे कारण काळा पैसा, भ्रष्टाचार आणि बोगस नोटा इत्यादी असल्याचे सांगण्यात येते.

केंद्र सरकारने 2016 साली एक धक्का देत एका रात्रीत सर्व 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा चलनातून हद्दपार केल्या होत्या. त्यानंतर 2000, 500 रुपयांची नोट चलनात आली. परंतू आता सरकारने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे एका वृत्तातून प्रसिद्ध झाले होते. परंतू केंद्र, आरबीआयकडून हे वृत्त फेटाळण्यात आले.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने तत्कालीन सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच ट्विट करत माहिती दिली की पुरेशा नोटा सध्या चलनात आहेत. नोटांची छपाई योजना अंदाजित आवश्यकतेनुसार तयार करण्यात आली आहे. 2000 च्या नोटा पुरेशा प्रमाणात आहे. वितरण व्यवस्थेत मूल्यानुसार 35 टक्क्यापेक्षा जास्त नोटा 2 हजारच्या आहेत. 2000 रुपयांच्या नोटांसंबंधित कोणताही निर्णय घेण्यात आला नाही असे देखील ट्विटमध्ये म्हणले होते.

आधिक मूल्यांच्या नोटांमुळे काळा पैसा वाढतो, भ्रष्टाचाराला प्रोस्ताहन मिळते. काळा पैसा वापरणारे जास्त मूल्याच्या नोटा जमा करुन ठेवतात. याबरोबरच बोगस नोटांची समस्या सोडवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अलिकडे वृत्त आले की पाकिस्तानातून 2000 रुपयांच्या बोगस नोटा भारतीय बाजारात आणल्या जात आहेत, या नोटांची सत्यता तपासणीही अवघड आहे. प्राप्तीकर विभागकडून घालण्यात आलेल्या छाप्यात 2000 रुपयांच्याच नोटा जास्त जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे कर चूकवेगिरी आणि गैरव्यवहार केले जातात असे ही स्पष्ट झाले आहे.

काय होईल परिणाम 
2000 हजार रुपयांच्या नोटा चलनातून कमी झाल्याने काळ्या पैशाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यावर बंधन येतील. सरकारमधील सर्वात मोठी समस्या बोगस नोटा समजल्या जातात. दोन हजाराच्या नोटा बंद झाल्यास बोगस नोटांचा व्यापार करणाऱ्यांना अडचणी उद्भवतील. कारण यातून कमी मूल्याच्या नोटा तयार करणे आणि त्यातून कमी मिळणारा नफा तसेच अडकण्याचा धोका अधिक असतो. देशात डिजिटल व्यवहार वाढवणे हा सरकारचा उद्देश आहे मात्र त्यात सरकारला आवश्यक ते यश आले नाही. अधिक मूल्याचा नोटा कमी झाल्यास लोक मोठ्या व्यवहारांसाठी डिजिटल व्यवहाराचा वापर करतील.

Visit  :Policenama.com