Coronavirus : ‘कोरोना’चा कर्दनकाळ ठरतोय साबण ? जाणून घ्या ‘सत्य’

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी हात स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी सॅनिटायझर्स व जंतुनाशक द्रव, जेल, क्रीमचा वापर केला जातो. अशा स्थितीत साबणाने हात धुवूनच या विषाणूचा मुकाबला आपण जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो. किंबहुना सॅनिटायझर्स ऐवजी साबणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. बाजारात सॅनिटायझर्सच्या किंमती आता अवाच्या सवा वाढल्या आहेत शिवाय त्यांची टंचाई निर्माण होऊ शकते म्हणून त्यावाचून अडून राहणे अजिबात गरजेचे नाही. साध्या साबणाने हात धुतले तरी हा विषाणू निष्क्रीय होतो.

विषाणू हा आधी आपल्या शरीराबाहेर निद्रिस्त अवस्थेत असतो. त्यानंतर तो आपल्या शरीरात गेल्यानंतर तो सक्रिय होतो. कोरोना इतर विषाणूंसारखाच आहे. विषाणू म्हणजे नॅनो कणांचा स्वसमुच्चय असतो त्याची सर्वात कमजोर कडी हे त्याच्या भोवती असलेले द्विस्तरीय मेदावरण ही असते. आपण जेव्हा साबणाने हात धुतो तेव्हा हा विषाणू पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे उद्ध्वस्त होतो. कारण साबणाने या विषाणूचे मेदावरण म्हणजे संरक्षक कवच नष्ट होते व त्या विषाणूचे तुकडे तुकडे होऊन तो निष्क्रिय होतो. 1) रायबोन्युक्लिइक अ‍ॅसिड (आरएनए),2) प्रथिने 3) मेदावरण. विषाणू जेव्हा मानवी पेशीत प्रवेश करतो तेव्हा तो याच रचनेमुळे टिकाव धरू शकतो. या घटकांना एकत्र राखणारा मेदावरणाशिवाय कुठलाही मजबूत असा कुठलाही घटक नसतो. त्यामुळे साबणाने त्यावर आघात केला की, विषाणूचे तुकडे होतात. पण हा विषाणू आपण साबणाने हात धुतले नाहीत तर शरीरात यजमान पेशीत घुसून बस्तान बसवतो व तिथे आपली पिलावळ तयार करतो जेव्हा ही संसर्गित पेशी मरते तेव्हा ही विषाणूंची वाढती पिलावळ इतर पेशींवर चालून जाते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like