चारित्र्यावर संशय घेऊन सख्ख्या भावांनीच केला बहिणीचा खून, तिघे गजाआड

पोलीसनामा ऑनलाईन – ठाण्यातील डायघर पोलिस स्टेशन परिसरात सख्ख्या भावांनी बहिणीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार होत असलेल्या भांडणाचा शेवट निर्घृण हत्येने झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक भाऊ फरार आहे.

प्रतिभा प्रविण म्हात्रे (वय-29 वर्षे) असे मृत तरुणीचे नाव आहे.

प्रतिभा एप्रिल महिन्यात ती 15 दिवस घरी काही न सांगता बाहेरगावी गेली होती. ती परत आल्यावर तिला भावांनी तिला विचारले असता तिने नीट उत्तरे न दिल्याने त्यांच्यात भांडण झाले. भांडण टोकाला जाऊन तीन सख्ख्या भावांनी लोखंडी सळईने प्रतिभाला बेदम मारहाण केली. यातच तिने जीव सोडला. ही घटना कोणाला कळू नये, म्हणून तिघांनी बहिणीच्या शरीराचे तुकडे करुन तिला 1 मेच्या रात्रीच जाळून टाकले.

याबाबत कोणालाच काही माहित नव्हते. यावेळी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी प्रतिभाच्या भावांची कसून चौकशी सुरु केली. तिची हत्या करुन तिला जाळून टाकल्याचे तिघांनी कबूल केले.

डायघर येथे राहणार्‍या प्रतिभा हिचा विवाह 2009 साली झाला होता. मात्र, एका वर्षातच तिचा घटस्फोट झाला होता. तेव्हापासून प्रतिभा आपल्या आईवडील आणि भावासोबत डायघर येथे माहेरी राहत होती. प्रतिभा अधूनमधून अचानक घर सोडून निघून जायची. ती कुठे जाते ? याची चौकशी भावांनी केली असता ती बिअर बारमध्ये महिला वेटर म्हणून देखील काम करीत होती, अशी माहिती भावांना मिळाली होती.

या प्रकारामुळे गावात बदनामी होत असल्याने प्रतिभाचे तिच्या भावांसोबत नेहमी भांडणे होते होती. दरम्यान, एप्रिल महिन्यात प्रतिभा कोणालाही न सांगता अचानक घर सोडून निघून गेली होती.

15 दिवसानंतर ती घरी परतली. तेव्हा तिच्या भावंडांनी तिला इतके दिवस कोठे होतीस ?, असा जाब विचारला. या कारणावरून चार भावंडे आणि बहिणीत जोरदार भांडण झाले. त्यानंतर 1 मे रोजी रात्री प्रतिभाचे भाऊ नाथा अशोक पाटील (31), भगवान अशोक पाटील (24), बालाजी अशोक पाटील (20) आणि पांडुरंग अशोक पाटील यांनी संगनमत करून तिला लोखंडी सळीने मारहाण केली. तसेच तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. याप्रकरणी डायघर पोलिसांनी तिघा भावांना अटक केली असून एक भाऊ फरार आहे.