9 दिवसाच्या बॅटरीसह Realme Band झाला भारतात लॉन्च, किंमत 1499, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : Realme 6 मालिकेबरोबरच कंपनीने आज आपला रिअलमी बँडही भारतात लाँच केला आहे. रिअलमी बँडबरोबरच कंपनीने वियरेबल मार्केटमध्येही प्रवेश केला आहे. बर्‍याच फिटनेस ट्रॅकर्स प्रमाणे, रिअलमी बँडमध्येही कंटिन्यूएस हार्ट रेट मॉनिटरिंग, 9 दिवसांचा बॅटरी बॅकअप, IP68 वॉटर-रेझिस्टन्स आणि स्टेप काउंटची वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत. या बँडमध्ये 5 बिल्ट- इन वॉच फेसेस देण्यात आहे आहेत. ओटीए अपडेट्सद्वारे आणखी डायल चेहरे सादर केले जातील असेही कंपनीने म्हटले आहे.

त्याची खास गोष्ट अशी आहे की, त्यात भारतासाठी खास डिझाइन केलेला क्रिकेट मोड आहे. भारतात रिअलमी बँडची किंमत 1,499 रुपये ठेवण्यात आली आहे आणि ग्राहकांना ती ब्लॅक, ऑलिव्ह ग्रीन आणि लाइट यलो कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. त्याची विक्री 9 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल. ग्राहक हे रिअलमी वेबसाइट, अ‍ॅमेझॉन इंडिया आणि रिअलमी स्टोअर वरून खरेदी करण्यास सक्षम असतील.

रिअलमी बँडच्या आणखी वैशिष्ट्यांविषयी सांगायचे तर यात फाईव्ह लेवल ब्राइटनेस आणि 160 x 80 पिक्सल रिझोल्यूशनसह 0.96 इंच रंगाचे वक्र एलसीडी डिस्प्ले आहे. एक टच बटण देखील आहे, जे नेव्हिगेशन आणि इतर ऑपरेशन्ससाठी वापरले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, रेज टू वेक अप फंक्शन आणि ग्रॅव्हिटी सेन्सर देखील देण्यात आले आहे. या बँडमध्ये टीपीयू मटेरिअल आहे, जे पाणी, कोल्ड, तेल आणि एजिंग रेझिस्टन्स आहे. लो बॅटरी अलर्ट देण्यातही ते सक्षम आहे. यात ऑटोमैटिक मोशन रिकॉग्निशन, आणि गोल कम्पलिशन रिमाइंडर यासारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.

रिअलमी बँडमध्ये 90mAh बॅटरी दिली गेली आहे, जी ऑटो हार्ट रेट फंक्शन चालू न करता 9 दिवस चालू शकते. रीअल-टाइम हार्ट-रेट सेन्सर, स्लीप क्वालिटी मॉनिटर आणि स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हिटी मॉनिटरचा समावेश आहे. हा बँड सायकलिंग, धावणे, चालणे, हायकिंग, क्लाइंबिंग आणि योगा सारख्या अनेक क्रिडा गतिविधींचा मागोवा घेऊ शकतो. यात प्लग-इन चार्ज आहे. ज्यामुळे स्वतंत्र चार्जर ठेवण्याची आवश्यकता नाही. तसेच हा बँड कनेक्ट केलेल्या स्मार्टफोनच्या नोटिफिकेशन देखील दर्शवितो. रिअलमी लिंक अ‍ॅपच्या मदतीने बँड स्मार्टफोनशी कनेक्ट केला जाऊ शकतो. दरम्यान, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच मल्टी – लँग्वेज फॉन्ट आणि हवामान अंदाजासाठी अपडेट जारी केला जाईल.