Corona in India : कोरोनाचा कहर ! देशात गेल्या 24 तासात 3.32 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण, 2,255 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात 24 तासांदरम्यान 3.32 लाखांपेक्षा जास्त कोरोना प्रकरणे नोंदली गेली आहेत. कोणत्याही देशात एका दिवसात संसर्गाची इतकी जास्त प्रकरणे सापडण्याचा हा नवा विक्रम आहे. या नवीन प्रकरणांसह देशात आतापर्यंत कोरोनाने 1,62,57,164 लोक संक्रमित झाले आहेत. तर 1,36,41,572 लोक बरे झाले आहेत. सध्या देशात कोरोनाची 24.21 लाखांपेक्षा जास्त सक्रिय प्रकरणे आहेत.

24 तासात 3,32,175 प्रकरणे आली
गुरुवारी रात्री 12.15 वाजता मिळालेल्या माहितीनुसार 24 तासात देशात 3,32,175 कोरोनाची नवी प्रकरणे सापडली. या दम्यान आणखी 2,255 लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून 1,86,927 झाली आहे. सध्या देशात 24,21,970 सक्रिय प्रकरणे आहेत.

रिकव्हरी रेट घसरला
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी आठ वाजता जी आकडेवारी दिली त्यानुसार, 24 तासांच्या कालावधीमध्ये 3,14,835 नवीन प्रकरणे नोंदली गेली. तर 2,104 लोकांचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या वाढून 1,84,657 झाली आहे. एकट्या महाराष्ट्रात 568 लोकांचा मृत्यू झाला. प्रकरणे सतत वाढत असल्याने बरे होण्याचा दर घसरून 84.46 टक्के झाला आहे. मागील 8 फेब्रुवारीला बरे होण्याचा दर 97.2 टक्के नोंदला गेला होता.

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू
कोरोनाने 24 तासात ज्या 2,104 लोकांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी सर्वाधिक 568 लोक महाराष्ट्रातील आहेत. यानंतर दिल्लीत 249, छत्तीसगढमध्ये 193, उत्तर प्रदेशमध्ये 187, गुजरातमध्ये 125 आणि कर्नाटकमध्ये 116 लोकांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत एकुण 1,84,657 मृत्यू झाले, ज्यामध्ये महाराष्ट्रात 61,911, कर्नाटक 13,762, तमिळनाडु 13,258, दिल्लीत 12,887, बंगालमध्ये 10,710, उत्तर प्रदेशात 10,346, पंजाबमध्ये 8,114 आणि आंध्र प्रदेशात 7,510 मृत्यू झाले आहेत.