सावधान ! पुणे, मुंबईसह राज्यातील 3 जिल्ह्यात ‘अतिवृष्टीचा’ इशारा,

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – येत्या 24 तासाता राज्याच्या 5 जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि पुणे या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस बरसू शकतो असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. आणखी दोन दिवस पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. वेधशाळेने बुधवारी रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारीसुद्धा बऱ्याच भागात अतिवृष्टी होऊ शकते. आज दुपारी साडे अकरापासूनच मुंबईमध्ये रेल्वे ठप्प आहे. अनेक शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात मान्सून सक्रिय होऊ शकतो. परंतू गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे आणि चाकारमान्यांचे हाल झाले आहेत.

पुढील 24 तासात मुंबई आणि ठाण्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसाने रेकॉर्ड मोडला आहे. यंदा सरासरी 403 मिमी इतका पाऊस झाला आहे. शक्यतो या महिन्यात 341 मिमी पावसाची शक्यता असते.

आरोग्यविषयक वृत्त –