‘या’ दिवशी होतात सर्वात जास्त ब्रेकअप, सर्वेतून आले समोर

मुंबई : वृत्तसंस्था – प्रेम आंधळ असतं असे म्हटले जाते. मात्र प्रेमात पडल्यानंतर फक्त एक कारण दुरावा निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरत. दुरावा निर्माण झाला कि हे प्रेमप्रकरण ब्रेकअपपर्यंत जाऊन पोहचते. प्रेमाच्या नात्यामध्ये निर्णाण होणारी दरी म्हणेज ब्रेकअप. ब्रेकअप संदर्भात एक सर्व्हे करण्यात आला आहे.

या सर्वेमध्ये काही आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.एका वेबसाईटने एक हजार लोकांवर सर्वे केला आहे. यामध्ये सर्वात जास्त ब्रेकअप हे शुक्रवारी होत असल्याची बाब समोर आली आहे. प्रेमात बुडालेल्यांची याच दिवशी फसवणूक होते. असा निष्कर्ष सर्वे करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या वुमेन हेल्थ या संस्थेने काढला आहे. या संस्थेने नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे त्यानुसार, जर आपल्याशी कुणी खोट बोलत आहे अशी जाणीव जर शुक्रवारी झाली, तर ती व्यक्ती हमखास तुमची फसवणूक करू शकते. सर्वेमध्ये ७५ टक्के लोकांच्या बाबतीत याच दिवशी असे घडल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

प्रेमात फसवणूक करणे ही लोकांची मानसिकता बनली आहे. जे लोक नियमांचे काटेकोर पालन करता, तेच जवळच्या व्यक्तीची फसवणूक करतात, असे illict encounters चे प्रवक्ते क्रिस्टन ग्रांट सांगतात. अशी लोक आठवड्यातून दोनदा आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटतात. त्यामध्ये ६५ टक्के लोक मंगळवारी आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर राहणे पसंत करतात. जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत या व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत खोटे बोलत राहतात, असे ग्रांट यांनी सांगितले.