बायकोला सोडुन प्रेयसीसोबत घरोबा करणाऱ्या तरूणास नातेवाईकांनी दिला चोप 

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – एक पत्नीस दगा देऊन दुसरी सोबत घरोबा करणाऱ्या एका रिक्षाचालकास त्याच्या सासरकडच्यांनीच बेदम चोप दिला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी मारहाण करून त्याला हर्सूल येथील एका खोलीत नेऊन त्याच्या पत्नीसोबत डांबून ठेवले ठेवल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती  सिडको पोलिसांना मिळताच त्यांनी हर्सूल येथे जाऊन जखमी रिक्षाचालकाची सुटका केली आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या रिक्षाचालकाने नाव शोएब खान (२७,रा.बायजीपुरा)असे आहे. सिडको पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार , शोएब हा रिक्षा चालक असून त्यास पत्नी आणि दोन मुले आहेत. मुलांना आणि पत्नीला हर्सूल येथे सोडून शोएबने दुसऱ्या एका महिलेसोबत घरोबा केला होता. तिच्या सोबत तो  मिसारवाडीतील गल्ली नंबर १० मध्ये राहत होता. ही बाब सासरकडच्यांना माहित झाली. त्यांनी मिसारवाडीतील त्याच्या खोलीचा पत्ता लावून मंगळवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास त्याला सर्वांनी मिळून बेदम चोप दिला.या मारहाणीत शोएबच्या डोक्याला मर लागल्याने तो रक्तबंबाळ झाला.

शिवाय त्याच्या शरीरावर देखील वळ उमटले होते. एवढे करून रुग्णालयात दाखल कारण्या एवजी त्याला खोलीत डांबून ठेवण्यात आले.नागरिकांनी सिडको पोलिसांना फोन करून एका तरूणाचा खून करून काही जणांनी त्याचे प्रेत सोबत नेल्याचे कळविले. घरात रक्ताचे डाग पडलेले दिसले. पोलिसांनी तपास करून हर्सूल येथील एका घरातून जखमी शोएबची मुक्तता केली.आणि उपचारासाठी त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शोएबच्या एका साल्याला पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.