Jio नं आणले 5 नवीन ‘पोस्टपेड प्लॅन’, डेटा रोलओव्हरसह मिळत आहेत ‘या’ सुविधा, सुरुवातीची किंमत 399 रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओने आज Jio PostPaid Plus प्लॅन जाहीर केला आहे, जो वापरकर्त्यांना उत्तम सेवा आणि कनेक्टिव्हिटीसह करमणुकीचा अनुभव देईल. जिओ पोस्टपेड प्लस प्लॅनची प्रारंभिक किंमत 399 रुपये आहे. 24 सप्टेंबर 2020 पासून Jio पोस्टपेड प्लॅन सर्व Jio स्टोअरमध्ये उपलब्ध असेल. जिओच्या या सर्व नवीन पोस्टपेड प्लॅन्समध्ये अमर्यादित व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगसह Netflix, Amazon Prime, Disney+ Hotstar चे विनामूल्य सब्सक्रिप्शन दिले जाईल.

डेटा रोलओव्हरची मिळेल सुविधा
जिओ पोस्टपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ओटीटी अ‍ॅप्सच्या विनामूल्य सबस्क्रिप्शनसह 500GB पर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा दिली जाईल. म्हणजेच, जर आता प्लॅनमधील डेटा वापरात येत नसेल तर पुढच्या महिन्यात त्याचा समावेश केला जाईल. या व्यतिरिक्त यूएसए आणि युएईमध्ये वापरकर्ते विनामूल्य आंतरराष्ट्रीय कॉल करू शकतील. आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा केवळ 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे. या प्रकारची सेवा देशात प्रथमच सादर करण्यात आली आहे. जगातील कोठूनही भारतात येणारे कॉल आता प्रति मिनिट 1 रुपये दराने उपलब्ध होतील. तथापि, यासाठी वाय-फाय कॉलिंग वापरावे लागेल. आपण भारताबाहेर जगात कुठेही कॉल करू इच्छित असाल तर यासाठी आपल्याला प्रति मिनिट 50 पैसे द्यावे लागतील.

399 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये 75GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस सुविधा उपलब्ध असेल. तसेच 200GB डेटा रोलओव्हर देखील देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त Netflix, Amazon Prime आणि Disney+ hotstar VIP चे सब्सक्रिप्शन दिले जात आहे.

599 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये 100GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस सुविधेसह अतिरिक्त सिम कार्डवर फॅमिली प्लॅन उपलब्ध असेल. तसेच Netflix आणि Amazon Prime सारख्या ओटीटी कंटेंटचे सब्सक्रिप्शन मिळेल. या व्यतिरिक्त आपण 200GB पर्यंत डेटा रोलआउट करण्यास सक्षम असाल.

799 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये 150GB डेटा, 200GB डेटा रोलआउट तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळेल. या व्यतिरिक्त, आपल्याला ओटीटी कंटेंटचे विनामूल्य सब्सक्रिप्शन मिळेल. यासह या प्लॅनमध्ये दोन सिमवर फॅमिली प्लॅनची सुविधा मिळेल.

999 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये 200GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस सुविधेसह 500GB डेटा रोलओव्हर उपलब्ध असेल. तसेच 3 सिमवर फॅमिली प्लॅनचा आनंद घेता येईल. त्याचप्रमाणे बाकी प्लॅन्सनुसार यामध्येही ओटीटी कंटेंटचे विनामूल्य सब्सक्रिप्शन मिळेल.

1499 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये 300GB डेटा आणि 500GB डेटा रोलआउटसह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस सुविधा प्रदान केली जात आहे. तसेच Netflix आणि Amazon prime सारख्या ओटीटी कंटेंटचे विनामूल्य सब्सक्रिप्शन मिळेल. एवढेच नव्हे तर या प्लॅनमध्ये यूएसए आणि युएईला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा सुविधा देखील मिळणार आहे.