वेंडल रॉड्रिक्स, ज्यानं दीपिका पादुकोणला मॉडेल आणि रातोरात ‘स्टार’ बनवलं ! जाणून घ्या पूर्ण कहाणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – इ़ंडियातील आयकॉनिक फॅशन डिझायनर वेंडल रॉड्रिक्स आज या जगात नाही. त्यानं हॉटेल मॅनेजमेंटनं आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यानं फॅशनचं शिक्षण घेतलं. त्यांनं होम स्टेट गोव्यासाठीही खूप काम केलं. तो पर्यावरणवादी होता. त्यांनं पुस्तकंही लिहली. LGBTQ कम्युनिटीसाठी योगदानही दिलं. तो काही सिनेमातही काम करताना दिसला. 12 फेब्रुवारी 2020 रोजी त्याचं निधन झालं. त्यावेळी ते गोव्यातील आपल्या घरी होता. 28 मे रोजी त्याचा वाढदिवस असतो. आज आपण त्यांच्या आयुष्यातील काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत.

वेंडलचा जन्म 28 मे 1960 रोजी मुंबईतील गोव्याच्या कॅथलिक फॅमिलीत झाला होता. त्यांनं मुंबईतच शिक्षण घेतलं. ते 22 वर्षांचा असताना त्याला मस्कटमध्ये नोकरी लागली. तिथं तो रॉयल ओमान पोलीस ऑफिसर्स क्लबच्या केटरींग डिपार्टमेंटमध्ये असिस्टेंट डायरेक्टर होते. आता वेंडलला फॅशनचा अभ्यास करायचा होता. सॅलरीच्या पैशातून बचत करत 1986 ते 1988 पर्यंत त्यानं पॅरिस आणि लॉस एंजेलिस सारख्या ठिकाणी फॅशन डिझायनिंगचा अभ्यास केला.

https://twitter.com/30Kumaar/status/1266378218925252610?s=20

दीपिका पादुकोणच्या मॉडेलिंग आणि अ‍ॅक्टींग करिअरचं श्रेय काही प्रमाणात वेंडलला जातं. एका मुलाखतीत वेंडलनं सांगितलं होतं की, त्यानं दीपिकाला एका मॉलमध्ये पाहिलं होतं. तिला पाहताच वेंडलनं तिला सल्ला दिला की, तिनं मॉडेल बनायला हवं. वेंडलच्या या गोष्टीवर दीपिकाची आई नाराज झाली परंतु दीपिकानं मॉडेलिंगचं क्षेत्र निवडलं. तिनं वेंडलसोबत खूप काम केलं. अचानक फराह खाननं मलायका अरोराला सांगितलं की, शाहरुखच्या अपोजिट कास्ट करण्यासाठी तिला एक मॉडेल हवी आहे. मलायका वेंडलची चांगली मैत्रीण होती. मलायकानं ही गोष्ट वेंडलला सांगितली. त्या दिवसात वेंडल एख फॅशन शो करत होता. इथंच मलायका देखील होती. वेंडल म्हणाला, जी पहिली मुलगी स्टेजवर दिसेल ती त्याची शाहरुखसाठीची रेकमंडेशन असेल. हा फॅशन शो दीपिकानं ओपन केला होता. अशा प्रकारे दोन वर्ष मॉडेलिंग करणाऱ्या दीपिकाला शाहरुख खान सोबत डेब्यू करण्याची संधी मिळाली. फक्त दीपिकाच नाही तर अनुष्काही वेंडलचा शोध मानली जाते.

वेंडलनं आपल्या करिअरमध्ये तीन पुस्तकं लिहिली. पहिलं फॅशनवर मोडा गोवा (2012), दुसरं त्यांचं आत्मचरित्र द ग्रीन रूम (2012) आणि तिसरं गोव्यावर पोस्केम (2017). पुस्तकंच नाही तर तो सिनेमातही अ‍ॅक्टीव होता. अ‍ॅक्टींगची सुरुवात त्यांनी कॅटरीना कैफसोबत केली होती. 2003 साली आलेल्या या सिनेमाचं नाव होतं बूम. यात वेंडलचा कॅमिओ रोल होता. यानंतर वेंडल अमेरिकन टीव्ही शो ट्रू वेस्ट मध्ये दिसला. 2008 साली आलेला फॅशन हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.