उत्तर कोरिया : हुकूमशहा किम जोंग उन कोमामध्ये असल्याचा दावा, बहिण किम यो जोंगला मिळाले सत्तेचे अधिकार!

नवी दिल्ली : उत्तर कोरियाचा शासक किम जोंग उन बाबत अनेक तर्क वर्तवले जात आहेत. कोरोना व्हायरस महामारीत काही आठवड्यापूर्वी किमच्या मृत्यूच्या बातम्या आल्या होत्या, ज्या नंतर चुकीच्या असल्याचे समजले. आता पुन्हा एकदा किमच्या आरोग्याबाबत एक नवीन दावा समोर आला आहे, ज्यानुसार तो आजारामुळे कोमात आहे आणि सध्या त्याची बहिण किम यो जोंग देशाची सत्ता सांभाळत आहे.

ब्रिटिश वृत्तपत्र एक्सप्रेसने दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रपती किम डे जुंग यांच्या निकटवर्तीयाच्या संदर्भाने सांगितले की, किम जोंग अजून जिवंत आहेत, परंतु कोमात आहेत.

चांग सांग मिन ने दक्षिण कोरियाई मीडियाला सांगितले की, उत्तराधिकारची योजना अजून पूर्णपणे तयार नाही आणि किमच्या गैरहजेरीत सत्ता जास्तवेळ रिकामी राहू नये, यासाठी त्यांची बहिण किम यो जोंगकडे तात्पुरते अधिकार देण्यात आले आहेत.

यापूर्वी, दावा करण्यात आला होता की, हृदयाच्या सर्जरीत गडबड झाल्याने किम अतिशय आजारी आहे किंवा त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, याच्या काही दिवसानंतर एका फर्टिलायझर प्लांटच्या उद्घाटनादरम्यान किम दिसून आले होते, ज्यानंतर दावा फेटाळला गेला होता.

उत्तर कोरियात होतील आत्महत्या
तर, किमच्या स्थितीबाबत दाव्यांमध्ये शंका व्यक्त केली गेली आहे की, देशाच्या शासकाच्या स्थितीमुळे परिस्थिती बिघडू शकते आणि उत्तर कोरिया बरबादीच्या टोकावर पोहचू शकते, कारण देशात किमची ओळख आपल्या माजी शासकाच्या तुलनेत खुप दयाळु राष्ट्राध्यक्ष म्हणून बनली आहे, ज्याने अनेक कल्याणकारी पावले उचलली आहेत.

जगातील हुकूमशहांवर पुस्तकं लिहिणारे लेखक क्रिस मिकुल यांचे म्हणणे आहे की, जर किमचा मृत्यू झाला, तर यामुळे उत्तर कोरिया उध्वस्त होईल, कारण तेथे मोठ्या संख्येने आत्महत्या होतील, ज्या रोखणे अवघड असेल.