पोलिस उपयुक्तांनी सांगितलं कोणत्या अवस्थेत सापडला होता सुशांत सिंहच्या Ex मॅनेजर दिशाचा मृतदेह, कोणाला केला होता शेवटचा ‘कॉल’

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : मुंबई पोलिस डीसीपी झोन 11 विशाल ठाकूर यांनी सुशांतसिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन संबंधित महत्त्वपूर्ण माहिती सामायिक केली आहे. ठाकूर यांनी दिशासी संबंधित सर्व बातम्यांचे खंडन केले, ज्यामध्ये म्हटले होते की, दिशाचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला होता. ठाकूर यांनी रविवारी सांगितले की हे स्पष्ट केले जात आहे की, अशा बातम्या ज्यात म्हटले जात होते की, सालियनचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला होता, त्या पूर्णपणे चूकीच्या आहेत, ठाकूर म्हणाले की, घटनेनंतर पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम केले.

ठाकूर पुढे म्हणाले की, त्यावेळी दिशा सालियानचे पालक तिथे हजर होते. डीसीपीने सांगितले की, दिशाने शेवटचा फोन आपली मैत्रीण अंकिताला केला होता, जिचे निवेदन नोंदविण्यात आले आहे. ते म्हणाले की या प्रकरणात आतापर्यंत 20-25 लोकांची निवेदने नोंदविण्यात आली आहे. यापूर्वी, सालियानच्या वडिलांनी मुंबई पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, दिशाच्या मृत्यूच्या प्रकरणी कुटुंबाला कुठल्याही गडबडीचा भीती नाही आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासणीने पूर्ण समाधान आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पत्रकाद्वारे दिशाच्या वडिलांनी असा आरोप केला आहे की, पत्रकार आणि माध्यमातील व्यक्ती मुंबई पोलिसांवरील त्यांच्या विश्वासाबद्दल वारंवार प्रश्न विचारून कुटुंबाला त्रास देत आहेत.

दिशाच्या वडिलांनी मुंबई पोलिसांवर व्यक्त केला होता विश्वास
दिशाच्या मृत्यूप्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दिशाचे वडील सतीश सालियान यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त, मालवणी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबई पोलिसांवरील त्यांच्या विश्वासावर आणि पोलिसांच्या तपासाबाबत सतत प्रश्न विचारून पत्रकार आणि माध्यमे त्यांच्या कुटुंबाला त्रास देत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like