साऊंड सिस्टीम, मंडप व्यवसायास परवानगीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

थेऊर – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली यामध्ये समुहाने येणारे अनेक व्यवसाय आहेत परंतु अनलाॅक चार ची घोषणा झाल्यानंतर यापैकी अनेक व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली परंतु साऊंड सिस्टीम लाईट जनरेटर व मंडप व्यवसायास आजपर्यंत परवानगी मिळाली नाही त्यामुळे पुणे जिल्हा साऊंड सिस्टीम लाईट जनरेटर व मंडप असोशियेशनने नुकतेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश काळभोर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या व्यवसायावर जवळपास तीन लाख लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे कोरोना महामारीच्या अनुषंगाने गेली सहा महिने सर्व व्यवसाय बंद करण्यात आले होते.परंतु अनेक व्यावसायिकांनी बॅक पतसंस्था येथून कर्ज घेतलेली आहेत त्यामुळे कर्जाचे हप्ते वेळेवर पोहोचले नसल्याने जातीच्या नोटीसा काढण्यात आल्या आहेत त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने गेल्या दोन महिन्यात दोन व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत.

शासनाने काही मार्गदर्शक सूचना आखून आम्हाला व्यवसायाची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा आम्हाला परिवारासह रस्त्यावर उतरुन अंदोलन करावे लागेल असे निवेदनात म्हटले आहे यावेळी अनिल पाटील निरंजन आव्हाळे सुनिल आव्हाळे सिध्दार्थ सुतार राहुल माने सुमित गायकवाड अमोल चांदणे विकी भोसले अजय बोजा नईम शेख सचिन काटे सुमीत शेलार आदी सदस्य उपस्थित होते.