अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीनं ‘सुपरग्लू’नं सीलबंद केला पत्नीचा ‘प्रायव्हेट’ पार्ट, प्रकृती गंभीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आफ्रिकन देश केनियामधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथल्या एका व्यक्तीने अवैध संबंधांच्या संशयावरून आपल्या पत्नीच्या खासगी भाग बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय डेनिस मुमो आपल्या कामामुळे जास्त वेळ प्रवासात घालवत असे. त्याच्या पत्नीचा चार पुरुषांशी प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. त्याने पत्नीच्या मोबाईलमध्ये काही मेसेजेस आणि फोटोदेखील पाहिली होते.

शेजाऱ्यांनी महिलेला वाचविले :
जेव्हा महिला वॉशरूममध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत होती, त्यावेळी शेजार्‍यांनी तिची सुटका केली असता, हे प्रकरण उघडकीस आले. असं म्हटलं जातं आहे की, बेकायदेशीर संबंध असल्याच्या संशयावरून मुमोने आपल्या पत्नीला बांधून तिच्या खासगी भागाला सुपरग्‍लूने बंद केले होते. आरोपीला सध्या अटक करण्यात आली असून महिलेला तिच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात दाखल केले आहे.

महिलेच्या खासगी भागाला मोठी दुखापत :
डेनिस मुमो मानसिकरित्या आजारी असल्याचेही सांगण्यात येत आहे. माहितीनुसार शेजार्‍यांनी जेव्हा मुमोला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांना जोरदार मारहाण केली. आरोपीने पोलिस कोठडीत आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी मुमोवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालानुसार महिलेच्या खासगी भागाला खूप दुखापत झाल्याचे समजते. तसेच महिलेच्या प्रजनन अवयवांनादेखील दुखापत झाल्याने पीडिता कधीही आई बनू शकत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, आरोपीच्या वकिलानेही महिलेवर अवैध संबंध असल्याच्या संशयाच्या प्रकरणात गुन्हा नोंदवून आर्थिक दंड करण्याची मागणी केली आहे. पोलीस चौकशीत मुंओने सांगितले कि, पत्नीच्या मोबाईलमध्ये तिचे नग्न फोटो पाहिले तेव्हा त्याला तिचे अवैध संबंध असल्याचा संशय आला होता, जे दुसर्‍या व्यक्तीला शेअर केले होते. हे फोटो त्याने आपल्या पत्नीच्या खासगी मेसेजमध्ये पाहिले आणि तेथूनही असेच उत्तर आले.