ठाण्यात निवृत्त आरटीओ अधिकार्‍याची गोळी झाडून आत्महत्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – आरटीओ कार्यालयातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना ठाणे येथे घडली आहे. मोहंमद सादीक शेख असे निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर होते त्याच रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. या घटनेने शेख कुटुंबीय हादरले आहे.

मोहंमद सादीक शेख हे ठाण्यातील कॅसलमील भागात राहत होते. त्यांना दारू पिण्याचे व्यसन होते. त्यातून त्यांना नैराश्याने ग्रासले होते. त्यामध्ये अजून कोरोना आणि लॉकडाऊनची भर पडली होती. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज राबोडी पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

शेख यांच्या व्यवसामुळे त्यांचे कुटुंबातल्या इतर सदस्यांसोबत मतभेद होते. त्यांची बायकोसुद्धा त्यांच्यापासून वेगळी राहत होती. ते आपल्या मुलासोबत एकटेच राहात होते.दुपारी मुलगा झोपलेला असतांना ते आपल्या खोलीत गेले आणि स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मुलगा झोपेतून उठल्यानंतर त्याला हे कळताच प्रचंड धक्का बसला.या घटनेचा पुढील तपास रोबोडी पोलीस करत आहेत.पोलिसांकडुन घटनास्थळावरील रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like