रिक्षा-कार अपघातात शिक्षणाधिकारी आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यु, प्रभारी पोलीस अधिकारी जखमी

अंबेजोगाई : पोलीसनामा ऑनलाइन – लातूर अंबेजोगाई रस्त्यावर दोन कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात लोणारचे गटशिक्षणाधिकारी यांचा पत्नीसह मृत्यु झाला असून अन्य पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात लातूर अंबेजोगाई रस्त्यावर बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ९ वाजता घडला.

गटशिक्षणाधिकारी दीपक त्रिंबक सवडतकर (वय ४४), शिक्षिका ज्योती दीपक सवडतकर (वय ४०, रा. चिखली, जि़ बुलढाणा) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.

या अपघातात विनोद तेजराव जाधव (वय ४०), कारचालक गजानन कुंडलिका निंबाळकर (वय ४५), रिक्षातील जखमी राजू बाळू उपाडे (वय ३०, रा. परळी वेस, अंबाजोगाई), संजय विठ्ठल जोगदंड (वय २८, रा. परळी वेस, अंबाजोगाई) तसेच केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनिल श्रीविनायक बिरला (वय ५०, रा. लातूर) हे जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, दीपक सवडतकर यांचा मुलगा लातूर येथे शिक्षण घेत आहे. त्याला भेटण्यासाठी ते पत्नी ज्योती व विनोद जाधव यांच्यासह (एम एच २८ ए झेड ११३४) या कारने लातूरला जात होते. तर, लातूरकडून अंबागोजाईकडे रिक्षा येत होती. कार आणि रिक्षा यांची धडक झाली. त्याचवेळी रिक्षाच्या मागोमाग (एम एच २४ व्ही १२) ही कार येत होती. तिची रिक्षा व कारला धडक बसली.

या कारमधील केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बिरला अंबागोजाईला जात होते. तेही या अपघातात जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –