रिक्षाचालकाने पोलिसाच्याच डोक्यात घातली मातीची कुंडी

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे असो वा मुंबई पोलिसांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. उल्हासनगरमधील वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका रिक्षाचालकाने एका पोलीसाच्या डोक्यात मातीची कुंडी घालून जखमी केले. यात पोलिसांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.३० सप्टेंबर) रात्री घडली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.सुदाम चौधरी असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. चौधरी यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

 

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’71966852-c578-11e8-960e-5d27108eee09′]

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सुदाम चौधरी हे दुचाकीहून गुरुवारी रात्री उल्हासनगर कॅम्प नंबर ४ च्या सतरमदास हॉस्पिटलच्या रस्त्यावरून जात होते. त्यावेळी ते ट्राफिक जॅममध्ये फसले. या वेळी ट्राफिक जॅममध्ये त्याच्या दुचाकीच्या मागे एक रिक्षाचालक सतत हॉर्न वाजवत होता. सुदाम यांनी त्या रिक्षा चालकाला पुढे ट्राफिक जॅम आहे तुला जायचे असेल तर जा, असे सांगितले. याचा राग आल्याने रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारांनी शेजारी असलेली मातीचे कुंडी सुदाम चौधरी यांच्या डोक्यात घातली आणि त्यांना रक्त बंबाळ केले. यात पोलीस सुदाम चौधरी हे जखमी झाले. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

वेडिंग फोटोग्राफीची ऑर्डर देऊन उच्चशिक्षीत चोरट्यांची हायटेक चोरी


शहरात वाहनचालकांकडून पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन

 

नवी मुंबई : सीबीडी, सीवूड, नेरुळ, जुईनगर, सानपाडा भागातील वर्दळ असणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या कडेला होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतूककोंडी टाळण्यासाठी नो पार्किंग, समांतर पार्किंग, सम-विषम पार्किंगचे फलक बसविण्यात आले आहेत; परंतु वाहनचालकांकडून फलकावरील नियमांचे उल्लंघन होत असून, होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

[amazon_link asins=’8192910962,8192910911′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6b42503d-c57a-11e8-9128-4f92a80437a5′]

जाहीरात