Ricky Ponting | टीम इंडियाच्या हेड कोचची मिळाली होती ‘ऑफर’, रिकी पाँटिंगचा मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ricky Ponting | सध्या टीम इंडियामध्ये नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. नुकतीच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यानंतर टीम इंडियाचे हेड कोच म्हणून राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने विजयी सुरुवात करत मालिकेतील पहिल्या टी20 सामन्यात न्यूझीलंडचा (New Zealand) 5 गडी राखून पराभव केला. यावेळी ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) मोठा खुलासा केला आहे. आयपीएलच्या (IPL) शेवटच्या हंगामात त्याला टीम इंडियाच्या हेड कोचची ऑफर देण्यात आली होती असे त्याने म्हटले आहे. पण वर्कलोड असल्यामुळे त्याने ती ऑफर नाकारली होती.

 

रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) एका चॅनेलशी संपर्क साधताना टीम इंडियाच्या हेड कोचच्या ऑफरसंदर्भात खुलासा केला आहे. ‘मी माझ्या नोकरीच्या वर्षातून 300 दिवस भारतात राहतो. होय, बघा, आयपीएलदरम्यान माझे काही लोकांशी प्रशिक्षकपदसंदर्भात बोलणे झाले होते. ज्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधला होता ते यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते.पण वर्कलोड असल्याने ही ऑफर मी नाकारली. मी ऑफर घेतली असती तर मला आयपीएल कोचिंग, चॅनल 7 सारख्या गोष्टी सोडून द्याव्या लागल्या असत्या, जे योग्य नव्हते. पण लोकांना वाटते की तुम्ही या मोठ्या गोष्टी करू शकाल हे चांगले आहे.’ असे मत रिकी पाँटिंगने यावेळी व्यक्त केले.

 

द्रविडच्या या भूमिकेमुळे मी आश्चर्यचकित

रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) कुटुंब असूनही राहुल द्रविडने हे काम करण्यास होकार दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘मला आश्चर्य वाटते की द्रविडनेही ही ऑफर स्वीकारली. अंडर-19 च्या भूमिकेत तो किती खूश होता, याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. मला त्याच्या कौटुंबिक जीवनाबद्दल समजत नाही पण मला खात्री आहे की त्याला लहान मुले आहेत. त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी उचलण्यास होकार दिल्याचे मला आश्चर्य वाटते असे रिकी पाँटिंग म्हणाले.

 

Web Title :- Ricky Ponting | former australian captain ricky ponting reveales offered role team india head coach ipl 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Wifi Range Extender | आता यूजर्सला मिळेल वादळासारखा इंटरनेट स्पीड ! 1KM अंतरावरून सुद्धा होवू शकते WiFi ‘कनेक्ट’, झटपट होतील सर्व कामे

Pune Corona | चिंताजनक ! पुण्यात ‘कोरोना’ लसीकरणानंतरही आतापर्यंत 12000 ‘पॉझीटीव्ह’ तर 59 जणांचा मृत्यू

BMC Elections | BMC निवडणुकीपूर्वी ‘या’ माजी महापौरांचा राष्ट्रवादीत प्रवेश; मुंबईत NCP बळकट होणार