कर्नाटकातून पुण्यात आलेल्या व्यक्तीला चाकूने वार करून रिक्षाचालकांनी लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भावाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीला रिक्षाचालकाने चाकूने वार करून मारहाण करत लुबाडल्याची घटना उंड्री येथील क्लाउड नाईनच्या शेजारील टेकडीच्या परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी रिक्षाचालक व इतर दोन जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानया बसन्नादोरी (वय ४०, रा. मु. पो. बांदतळा, ता. शहापूर जि.यादगिरी रा. कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मानया बन्नादोरी मुळचे कर्नाटक राज्यातील राहणारे आहेत. त्यांच्या भावाचे लग्न आहे. पुण्यात त्यांचे काही नातेवाईक राहतात. त्यामुळे लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी ते पुण्यात आले होते. त्यावेळी ते आधी पिंपरीमधील एका नातेवाईकाकडे पत्रिका वाटण्यासाठी गेले. हडपसरच्या महंमदवाडी येथे त्यांची मेव्हणी राहते. दिवसभर पत्रिका वाटल्यानंतर ते सायंकाळी मेव्हणीच्या घऱी जाण्यासाठी निघाले. तेव्हा ते एका रिक्षात बसले. रिक्षालकाने त्यांना तरवडे वस्ती येथे नेत पुढे उंड्री येथील क्लाउड नाईनच्या शेजारी असलेल्या टेकडीजवळ नेले. तेथे गेल्यावर आधीच एक रिक्षाचालक उपस्थित होता. त्यावेळी दोघांनी त्याना चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील २४ हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण २६ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. त्यानंतर त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यात त्यांच्या डाव्या दंडावर व गालावर चाकूने मारून पसार झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like