मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांची बहीण आणि अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन यांची सासू ऋतु नंदा यांनी या जगाला निरोप दिला आहे. ऋषी कपूरची मुलीने आपली आत्याच्या मृत्यूची बातमी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेयर केली आहे. ऋतु नंदा ७१ वर्षाच्या होत्या.
रिद्धिमा कपूरने आत्याच्या मृत्यूची बातमी शेयर करत लिहिले की, “सबसे दयालु और सज्जन लोग जिनसे मैं मिली हूं – वे आपको फिर दोबारा वैसा महसूस नहीं कराते जैसे आप पहले किया करते थे. भगवान आपकी आत्मा को शांति दे.”
https://www.instagram.com/p/B7STnfMHq6W/?utm_source=ig_embed
रिद्धीमाच्या पोस्टवर एकता कपूरने लिहिले की, “हृदयाला स्पर्श करणारा शोक संदेश. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये श्वेता बच्चन यांचे सासरे रंजन नंदा यांचे निधन झाले होते. रिद्धिमा कपूर साहनी ही बातमी सामायिक करणार्या पहिल्या लोकांपैकी एक होती. त्यांनी लिहिले, “तुम्ही होता, आहात आणि नेहमीच एक लीजेंड रहाल. नेहमीच एवढ प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद.”
ऋषी कपूरची बहीण ऋतु नंदा रंजन नंदाची पत्नी होती आणि श्वेता बच्चन यांचा मुलगा निखिल नंदा याच्याशी विवाह झाला होता. एस्कॉर्ट्स लिमिटेड नावाच्या प्रसिद्ध अभियांत्रिकी कंपनीचे ते अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. ऋतु नंदा स्वतः एक उद्योजक होती आणि जीवन विमा व्यवसायाशी संबंधित होती.
रणजित कपूर यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की रितू कर्करोगाशी लढत होती. त्यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार केले जातील. २०१३ साली ऋतु यांना कर्करोग झाल्याचे आढळले होते आणि तेव्हापासून त्या या आजाराशी लढत होत्या.
फेसबुक पेज लाईक करा –
- झोपण्यापूर्वी ‘मोबाईल चेक’ करण्याच्या सवयीमुळे होतात ‘हे’ 6 धोके
- ‘चॉकलेट’ च्या पसंतीवरून समजते तुमचे व्यक्तिमत्व, ‘हे’ 5 प्रकार लक्षात ठेवा
- रिकाम्यापोटी चहा घेण्याचे ‘हे’ 4 धोके! वेळीच व्हा सावध!
- लाल कांद्याचे ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?
- ‘हेल्दी लिव्हर’ साठी ‘या’ 4 पदार्थांचा आहारात करा समावेश
- तणावग्रस्त असणार्यांनी करावेत ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या फायदे
- हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ‘या’ 4 तपासण्या करा ! जाणून घ्या 6 लक्षणे