RMD Foundation | आर एम डी फाऊंडेशन उभारणार शेतकऱ्यांसाठी ‘ऍग्रीकल्चर नॉलेज हब’ – शोभाताई आर धारीवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – RMD Foundation | शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. रात्रंदिवस कबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो. शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालतात, कारण भारतातील अर्थ व्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडित आहे. (RMD Foundation)

शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नावरून शेतकऱ्याची उपजीविका चालते. मात्र असे असले तरी अनेकदा परंपरागत शेती करताना कोणती नवीन बी बियाणे निवडावी, आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची, शेतमालाला योग्य बाजारभाव कसा मिळेल, शेतीबाबत पुढील आव्हाने कोणती, त्यावर काय उपाय योजना कराव्यात याबाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळण्याचा अभाव असतो, हीच बाब हेरून गरजेनुसार शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची निकड लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्याच ग्रामीण भागात सोलापूर जिल्ह्यातील निमगांव (ता. माढा) येथे ऍग्रीकल्चर नॉलेज हब (Agriculture Knowledge Hub In Nimgaon) उभारण्यात येणार आहे.

अशी माहिती आर एम डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल (Shobhatai R Dhariwal) यांनी माणिकचंद स्कायवन (कल्याणी नगर, पुणे) येथे माढा वेल्फेअर फाऊंडेशन (Madha Welfare Foundation) सोबत केलेल्या सामंजस्य करारावेळी दिली.

यावेळी आर एम डी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन (Janhavi Dhariwal Balan),
माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
एक कोटी रुपये निधीतून उभारण्यात येणाऱ्या ऍग्रीकल्चर नॉलेज हब
मध्ये एकाच वेळी 800 ते 1000 शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाची, व्याख्यानाची,
राहण्याची व शाकाहारी जेवणाची सोय असेल व प्रकल्प मार्च 2024 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती जान्हवी धारीवाल बालन यांनी दिली .

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Office New Building | पुणे पोलीस आयुक्तालयाचे रुप पालटणार, राज्य सरकारकडून 193 कोटींचा निधी

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : बसस्टॉपवर गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक, तीन गुन्ह्यातील चार लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Nashik City Police | प्रतिबंधित गुटखा पॅकिंग करणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश, साडे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Parkash Ambedkar On Election Commission | महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान कशासाठी? निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती उद्या ठरणार, समन्वय समितीची बारामतीत बैठक

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची CAA कायद्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका, ”बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा…”