धुम स्टाईलने जेष्ठ नागरिकाला लुटले ; २ सराईत गुन्हेगार गजाआड

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – देवपूरात सेवा निवृत्त जेष्ठ नागरिक यांना गोंदुर रोड मोबाइल टॉवर जवळ भागात मोटर सायकलने पाठलाग करत येत ट्रिपल सिट मोटरसायकल स्वार यांनी लाकडी काठीचा धाक दाखवत , त्यांचे खिशातील ऱोख 2000 रुपये काढुन घेतले .तसेच त्यांना धक्काबुक्की करून ,चोरटे तेथुन पसार झाले. अशी माहिती फोनद्वारे पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीने दिली. प्रत्यक्षदर्शीनि दिलेल्या वर्णनानुसार , सराईत गुन्हेगारांचा मागोवा घेण्याच्या सूचना देवपूर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी हेड कॉ.अब्दुल शेख आणि बंन्टी साळवे यांना दिल्या . या परिसरातील या आधीही चोरीच्या घटना घडल्या आहेत .

त्यामुळे घटनेचे गांभीर्य राखत पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली . तपासादरम्यान वाडिभोकर रोडवर पोलीस पथक पोहोचले असता , अचानक दोघांनी पळ काढला . पोलिसांना या दोघांचा संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून या दोघांना ताब्यात घेतले . या दोघांना ताब्यात घेताना पोलिसांमध्ये आणि चोरट्यांमध्ये झडपही झाली . अत्यंत शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी अंती ते सराईत गुन्हेगारच असून त्यांनीच चोरी केल्याचे निष्पन्न झाले .

त्यानंतर त्यांना देवपूर पोलीस स्टेशनला हजर केले . त्यांचे जवळील बनावट नंबर प्लेट क्रं. MH 41.N.8458 पल्सर काळ्या रंगाची दुचाकी जप्त केली . दोघांना पोलीसी खाक्या दाखवल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली . अधिक तपास देवपूर पोलिस करत आहेत