पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यपीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि.२२) मध्यरात्री दीडच्या सुमारास कात्रज-वडगाव बायपास रोडवर दत्तनगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख १८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

निलेश राजू कुंडले (वय 20, रा. पापळवस्ती, श्रीरामनगर, बिबवेवाडी), तेजस संदीप वाडकर (वय 20, रा. पापळवस्ती, बिबवेवाडी), सनी संजय साळवी (वय 20, रा. गणपतनगर, पापळवस्ती, बिबवेवाडी), सनी दत्तात्रय बोरकर (वय 19, रा. अप्पर व्हीआयटी शाळेच्या जवळ, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा एक साथिदार अंधाराचा फायदा घेत फरार झाला.

ही टोळी बेलदरे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. आरोपी निलेश कुंडले, सनि साळवी हे बिबवेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. निलेश कुंडले, तेजस वाडकर, सनी साळवी यांच्यावर गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल आहे. बेलदरे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले पाच ते सहा जण कात्रज-वडगाव बायपास रोडवर दत्तनगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर अंधारात लपून बसले असल्याची माहिती प्रदीप गुरव व पोलीस हवालदार विनोद भंडलकर यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून २ लोखंडी कोयते, मिरचीची पूड, २ दुचाकी, मोबाइल असा एकूण १ लाख १८ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्रीकांत तरवडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ २ बच्चन सिंह, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक महेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार प्रदिप गुरव, पोलीस हवालदार विनोद भंडलकर, गणेश सुतार, प्रणव सकपाळ, उज्वल मोकाशी, शिवदत्त गायकवाड, जगदीश खेडेकर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक महेंद्र पाटील करीत आहेत.

सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

पतिला सोडून अभिनेत्री जेनिफर विगेंट राहते आता ‘या’ अभिनेत्यासोबत

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

‘या’५ अभिनेत्रीच्या ‘सिंदूर’ लुकची ‘कमाल’ ; दिसतात ‘सुंदर’ आणि ‘संस्कारी’