धुळे : शाळेतील लाखो रुपयांच्या साहित्यावर चोरट्याने मारला डल्ला

धुळे : पोलिसनाम ऑनलाईन – शाळेत , “चोरी करु नये…!” असे शिकवले जाते. पण, मनपा शाळा क्रं. 14 मधील खोली क्रं. 1 व 3 मधील कुलुप तोडुन चोराने लाखो रुपयांच्या साहित्यावर डल्ला मारला.

या बाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की,  प्रभारी मुख्याध्यापक शरद सखाराम पवार,  शाळेतील शिक्षक व कर्मचारी शनिवारी सायंकाळी कामकाज आटोपुन घरी गेले.  सोमवारी सकाळी 7.10 वाजता नेहमी प्रमाणे शाळेत आले असता मुख्याध्यापक कार्यालय जवळील नं. 1 व 3 बंद खोलीचे कुलूप अज्ञाताने आवारात फेकले होते.  आत डोकावुन पाहिले असता जमिनीवर काही कागदपञे पडलेली दिसली. व लगेचच चोरी झाल्याचे लक्षात आले.

पोलीसांना चोरीची माहिती दिली असता काही वेळातच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. श्वान पथकाच्या मदतीने चोरट्यांचा मागोवा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला . पोलीसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला असता,  एकुण 1 लाख 800 रुपये किंमतीचे साहित्य चोरीस गेले असल्याचे प्रथमदर्शी उघडकीस आले.

या प्रकरणी प्रभारी मुख्याध्यापक पवार यांनी दिलेल्या लेखी तक्रारी नुसार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस करत आहे.