रॉबर्ट वाड्रा कोरोना पॉझिटिव्ह; प्रियांका गांधी आयसोलेशनमध्ये, निवडणूक सभा रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे प्रियांका यांनी आसामचा दौरा रद्द केला आहे. याचा एक व्हिडीओ शेर करत त्या म्हणाल्या, ”नुकतेच कोरोना संसर्गाच्या संपर्कात आल्यामुळे मला माझा आसाम दौरा रद्द करावा लागला, माझी कालची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.”

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी पुढे लिहिले, ”परंतू डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढचे काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहे. या गैरसोईसाठी मी आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करते, मी काँग्रेसच्या विजयासाठी प्रार्थना करते.” प्रियांका गांधी वाड्रा आज आसाममध्ये प्रचार करणार होत्या, तर उद्या त्या तामिळनाडूमधील श्रीपेरूमबुदूरला जाणार होत्या.

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांचे आसाममध्ये तीन मोर्चे होते. पहिला मोर्चा गोलपारा ईस्ट, दुसरा मोर्चा गोलकगंज आणि तिसरा मोर्चा सारुखेत्री येथे होणार होता, ज्याला रद्द केले गेले आहे. देशात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. गेल्या २४ तासांत ८० हजारपेक्षा जास्त नवीन प्रकरणे आली.

तेच रॉबर्ट हे फेसबुक पोस्टमध्ये लिहीत म्हणाले, ”दुर्भाग्याने मी कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आलो आहे आणि संक्रमित झालो आहे. तथापि मी एसिम्टोमॅटिक आहे, कोविड नियमांनुसार, मी आणि प्रियांका आयसोलेशनमध्ये आहे, तर प्रियंकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आनंदाची गोष्ट अशी की मुले आमच्यासोबत नाही आहेत, घरातील बाकी सदस्य निगेटिव्ह आहेत.”

भाजपच्या उमेदवारांच्या गाडीमध्ये EVM सापडल्याचा मुद्दा प्रियांका यांनी उपस्थित केला. याआधी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आसामच्या करीमगंज जिल्ह्यामध्ये भाजप उमेदवारांच्या गाडीमध्ये EVM मशीन सापडल्यावरून निवडणूक आयोगाला निशाण्यावर धरले होते. प्रियांका म्हणाल्या, ”काय स्क्रिप्ट आहे? निवडणूक आयोगाची गाडी खराब झाली, तेव्हाच तिथे दुसरी गाडी प्रकट झाली. गाडी भाजपच्या उमेदवारांची निघाली. निर्दोष निवडणूक आयोग त्यात बसून प्रवास करू लागला.”

प्रियांग गांधी वाड्रा म्हणाल्या, ”प्रिय EC, प्रकरण काय आहे? तुम्ही देशाला यावर काही स्पष्टीकरण देऊ शकता का? आम्ही सर्वजण मिळून बोलतो EC च्या निपक्षपातीपणाला वणक्कम?” तेच, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहून गांधी यांनी लिहिले, ”EC ची गाडी वाईट, भाजपाचा हेतू वाईट, लोकशाहीची परिस्थिती वाईट!”

EVM व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होण्याआधी प्रियांका गांधी वाड्रा यांनी ट्विट केले होते की,”प्रत्येक वेळी निवडणुकांच्या वेळी जेव्हा एखादा EVM खाजगी वाहनांमध्ये पकडला जातो, तेव्हा एक गोष्ट नक्की असते, पहिला ती गाडी प्रामुख्याने भाजपा उमेदवारांची असते, अन्यथा ती त्यांच्या मित्रपक्षांची असते.”

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा या ‘क्रोनॉलॉजी’ समजून घेत म्हणाल्या, अशा प्रकारच्या व्हिडीओंना एका घटनेच्या स्वरूपात घेतले जाते आणि नंतर बाद केले जाते. यासह, ज्यांनी खाजगी वाहनांमध्ये EVM सापडल्याचे व्हिडीओ उघडकीस आणले आहेत त्यांच्यावर आरोप करण्यासाठी भाजप आपली मीडिया सिस्टीम वापरते.

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या, ”खरे हे आहे की अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत आणि त्यांच्याबद्धल काहीही केले जात नाही. निवडणूक आयोगाने या तक्रारींवर निर्णायक कारवाई सुरु करण्याची आणि सर्व राष्ट्रीय पक्षांकडून EVM पुनर्मूल्यांकन करण्याची गरज आहे.