Roger Binny | ICC ने भारताला दिले झुकते माप, रॉजर बिन्नी म्हणाले….

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Roger Binny | ऑस्ट्रेलियात (Australia) सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये (T-20 World Cup) वादग्रस्त अंपायरिंग आणि निर्णयांची बरीच चर्चा होत आहे. त्यामध्ये आता भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात झालेल्या सामन्यानंतर आयसीसी (ICC) भारताला झुकतं देत असल्याचे काही माजी क्रिकेटपटूंचे मत आहे. यावरून बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binney) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

काय म्हणाले रॉजर बिन्नी?
रॉजर बिन्नी पाकिस्तानात होणाऱ्या आशिया कप (Asia Cup) आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत (Champions Trophy) म्हणाले की, ‘भारतीय संघाने पाकिस्तानात जायचं की नाही याबाबतचा निर्णय बीसीसीआयच्या हातात नाही. हा निर्णय घेणे हे सरकारचे काम आहे. ते आम्हाला परवानगी देतात’ असे रॉजर बिन्नी (Roger Binny) म्हणाले. तसेच यावेळी त्यांना ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये नुकताच झालेल्या भारत – बांगलादेश सामन्यातील वादाबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले ‘आम्हाला आयसीसी झुकतं माप देते हा आरोप योग्य नाही. प्रत्येकाला समान वागणूक मिळते. तुम्ही जसं म्हणताय तसं काही होत नाहीये. आम्हाला इतर संघापेक्षा असं वेगळं काय मिळतंय? भारत हा क्रिकेटमधील बलाढ्य शक्ती आहे. मात्र आम्हाला सर्वांना एकसमानच वागणूक मिळते.’ असे ते यावेळी म्हणाले.

तसेच यावेळी त्यांनी भारत पाकिस्तान किंवा इतर देशात जाणार की नाही याबाबतचा निर्णय क्रिकेट बोर्ड घेऊ शकत नाही.
तो निर्णय सरकावर अवलंबून असतो असे सांगितले. आम्हाला देश सोडण्यापूर्वी सरकारची परवानगी घ्यावी लागते.
तसेच इतर देश भारतात येण्यापूर्वी देखील सरकारची परवानगी घ्यावी लागते. आम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही.
आम्हाला सरकावर अवलंबून रहावे लागते.’असेदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

 

Web Title :- Roger Binny | bcci president roger binny statement over icc favored team india says what do we get different from other teams

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

T20 World Cup | “…तर भारत उपांत्यफेरीत खेळण्याच्या लायक नाही; इरफान पठाणने व्यक्त केले रोखठोक मत

Chandrakant Khaire | काँग्रेस आमदारांबाबत केलेल्या विधानाबाबत चंद्रकांत खैरेंची दिलगिरी, म्हणाले…

Uddhav Thackeray | ‘राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार’, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश